Skill Kolhapuri Radiator repairing Kolhapur Marathi News
Skill Kolhapuri Radiator repairing Kolhapur Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

रेडिएटर रिपेअरिंगमध्ये कोणीच धरू शकत नाही 'यांचा' हात....

संदीप खांडेकर

कोल्हापूर : बागल चौकातील फिरोज बाबू मुजावर हरहुन्नरी आहेत. फायबर वेल्डिंगसाठी त्यांच्याकडे ग्राहकांचा तुटवडा नाही. त्यातलं कसब त्यांच्या हातात उतरलं आहे. गाड्यांचे बंपर मॉडीफाय करण्यातही ते कमी नाहीत. रेडिएटर रिपेअरिंगच्या कामातही त्यांचा हातखंडा आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळं मेस्त्रीचं काम त्यांना स्वीकारावं लागलं. त्यांच्या अंगातील कौशल्याचा गाजावाजा त्यांच्या मित्र परिवारात आहे. क्रिकेटच्या भुतानंही त्यांना चांगलंच झपाटलंय. शास्त्रीनगरच्या मैदानावरील त्यांच्या कॉमेंट्रीला दाद देणाऱ्या क्रिकेट चाहत्यांचीही वानवा नाही. 

 फिरोज यांचे आब्बाजान ब्रेड, बटर, वर्की करण्याच्या कामात होते. बेकरीतले चटपटीत पदार्थ खरेदीत त्यांचा हात आकडता होता. कुटुंबातल्या बेताच्या परिस्थितीनं त्यांच्या खिशाला कात्री परवडायची नाही. दोन मुली व दोन मुलांच्या शिक्षणाची फिकीर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. फिरोज यांचा पुस्तकाशी दोस्ताना होता. सातवीच्या परीक्षेत वर्गात ते पहिले आले होते. आठवच्या वर्गातला प्रवेश मात्र त्यांच्या नशिबात आला नाही. मामा अजिज जमादार यांचे शाहू मिल चौकात गॅरेज होते. पोटासाठी त्यांच्या कामाचा श्रीगणेश झाला.

क्रिकेट कॉमेंट्रीतही त्यांचा हातखंडा

रेडिएटरच्या स्वच्छतेत त्यांचे हात थकले नाहीत. फायबर वेल्डिंगचे काम ते स्वत:च शिकले. धडकलेल्या गाड्या दुरूस्ती करणे अवघड काम. चेपलेल्या गाड्या चकचकीत करण्यात त्यांचा चांगलाच जम बसला. कोल्हापूरबाहेरच्या ग्राहकांच्या कानापर्यंत त्यांचे नाव पोचले. कमी खर्चातल्या त्यांच्या कामाचे कौशल्य ग्राहकांना आवडलं. आजही त्यांच्या या कामाला ब्रेक मिळालेला नाही. पांझरपोळमधील त्यांचे वर्कशॉप अतिक्रमणात गेले. त्यातून स्वत:ला सावरत त्यांनी प्रतिभानगरातल्या महापालिकेच्या भाडेतत्त्वारील गाळ्यात गॅरेज उघडलं. शास्त्रीनगरलगतच त्यांचे गॅरेज सुरू झाले.

मैदानावर  सामने पाहण्याची आवड

गाड्यांचे बंपर मॉडीफाय करण्यातलं कसबही त्यांनी आत्मसात केलंय.  कामातला कंटाळा घालविण्यासाठी त्यांची मैदानावर फेरी असायची. विश्‍वनाथ, दिलदार, जाता जाता संघांचा खेळ त्यांनी पाहिला होता. क्रिकेटचे खूळ तसे शालेय जीवनापासूनच त्यांच्या अंगात होते. मैदानावरचे सामने पाहताना कॉमेंट्रीचे शब्दही त्यांच्या कानावर पडायचे. काका पाटील यांच्यासह क्रिकेटच्या मित्रांचा गोतावळा त्यांचा वाढला. कॉमेंट्रीतल्या खुबी शिकण्याचा त्यांचा सराव सुरू झाला. मेस्त्री काम करत ते कॉमेंट्रीची जबाबदारीही पेलतात. दहा वर्षांपासून त्यांचे हे काम सुरू आहे. बागल चौकातल्या परिसरात वृक्षारोपणात त्यांचा पुढाकार राहिला आहे. सामाजिक कार्यातही ते पुढे असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT