पश्चिम महाराष्ट्र

सांडगे विकुन तो करतोय कुटुंबाचा उदरनिर्वाह...

अनिल पाटील

कोगनोळी (बेळगाव) - सध्या युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. भरपूर शिकूनही चांगली नोकरी मिळेनाशी झाली. त्यांच्यासाठी रमणलाल हा मोठा आदर्श ठरला आहे. अल्प भांडवलावर तो सांडगे विक्रीचा व्यवसाय परिसरातील चार बाजारात करीत आहे. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.

अल्प भांडवलात व्यवसाय करून तरुणांसमोर आदर्श

मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला रमणलाल कामाच्या शोधात कागल येथे आला. सुरुवातीला मिळेल तिथे काम करून आपला उदरनिर्वाह सुरू केला. पण म्हणावे, तसे आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने काहीतरी उद्योग, व्यवसाय करायचे ठरविले. पण व्यवसायासाठी लागणारे भांडवल नसल्याने अडचणी आल्या. त्यातून कमी भांडवलामध्ये शेजारच्या गावांमध्ये बाजारामध्ये सांडगे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. 

असा सुरु झाला व्यवसाय

दोन वर्षांपासून रमणलाल कोगनोळी, कागल, सांगाव, नेर्ली या चार गावामध्ये आठवडा बाजारात सांडगे विकणे व दिवसभर पुट्टे गोळा करण्याचा व्यवसाय सुरू केला. सध्या व्यवसायात चांगलाच जम बसला असून, त्यातून चार पैसे मिळत आहेत.
सांडगे व्यवसायासाठी लागणारे कच्चे सांडगे जयसिंगपूर येथून आठ रुपये किलोप्रमाणे आणले जातात. बाजारात बसून वाळू, सरपणाच्या शेगडीच्या साह्याने भाजून विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. एका बाजारात सुमारे शंभर-दीडशे पिशव्या विकल्या जातात, असे रमणलालने सांगितले.

व्यवसाय लहान अथवा मोठा न मानता पोटाची खळगी भरण्यासाठी सांडगे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे चार पैसे हाती लागत असून, त्यात 
समाधानी आहे.
- रमणलाल, कागल
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT