The smoker will get 200 rupees if shown 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरात आता आणखी झळकले वेगळे पत्रक 

सुस्मिता वडतिले

सोलापूर : सात रस्ता परिसरात असलेल्या सामाजिक न्याय भवन या कार्यालयात धुम्रपान करणारा दाखवल्यास 200 रुपये बक्षिस दिले जाणार, अशी लक्षवेधक पत्रके लावली आहेत. येथील इमारतीमध्ये स्वच्छता आहेच. मात्र, भिंतींवर थुंकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे इमारतीचे विद्रुपीकरण होत आहे. यावर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याबरोबर धुम्रपान करणाऱ्यालाही 200 रुपये दंड केला जाणार आहे. याचा खरोखर परिणाम होईल का हे पहावे लागणार आहे. मात्र, सध्या तरी या भागात हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

स्वच्छतेसाठी सरकार अनेक वेगवेगळे प्रयत्न करत आहे. जागृती म्हणून मोठ्या प्रमाणात जाहिराती व समाजप्रबोधनही करत आहे. मात्र, अजूनही त्याचा पूर्णपणे फरक पडला आहे, असे दिसत नाही. जेथून सरकारच्या धोरणाची अंमलबाजावणी होते, त्यातीलच अनेक कार्यालयाच्या भिंती पाहिल्यानंतर याचे वास्तव समोर येते. मात्र, यावर उपाय काढत सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय भवन कार्यालयाने शक्कल लढवली आहे. त्यांनी याबाबत पत्रक काढली आहेत. जिथे- जिथे धुम्रपान केले जाते, तिथे ती पत्रके चिटकवली आहेत. त्यात धुम्रपान करणाऱ्याला 200 रुपये दंड आकरला जाणार असल्याचे म्हटले आहे. तर धुम्रपान करणाऱ्याला दाखवणाऱ्याला 200 रुपये बक्षिस दिले जाणार आहे. 

सामाजिक न्याय भवनमध्ये सरकारच्या विविध विभागाच्या आर्थिक विकास महामंडळाची कार्यालये आहेत. याबरोबर जातपडताळणी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे कामकाज चालते. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची नेहमी येथे गर्दी असते. कामानिमत्त आलेले काहीजण स्वच्छता असताना सुद्धा तंबाखु, गुटखा व मावा खाऊन थुंकतात. त्यामुळे कोपरे रंगीबेरगी होऊन विद्रुपीकरण झालेले दिसून येते. शहरातील काही मुख्य पाहता त्यात 
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह इतर प्रमुख कार्यालयाच्या इमारतीतील अपवाद वगळता अनेक कोपऱ्यांवर थुंकल्याने विद्रुपीकरण होत आहे. सरकारी कार्यालयामध्ये स्वच्छता रहावी म्हणून नेहमीच असे वेगवेळ्या उपाययोजना केल्या जातात. त्याचा काही दिवस उपयोग होतो. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. आणि दंडही कागदावरच राहतात. केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या यादीत सोलापूरचा सामावेश झाल्यापासून अनेक कामे होते आहेत. त्यातच स्वच्छतेलाही महत्त्व देण्यात आले आहे. काही विकास कामे सुरु आसून काही कामे प्रगतीप्रतावर आहेत. त्यातच कार्यालयांनीही स्वच्छतेबाबत उचलेले पाऊल चर्चेचा विषय ठरले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT