Snakebite Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Snakebite Vaccine : खासगी रुग्णालयांनाही सर्पदंशावरील लस उपलब्ध होणार

सर्पदंशांवर शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा नसल्यामुळे उपचार करता येत नाहीत. हे रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात.

सकाळ वृत्तसेवा

सर्पदंशांवर शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा नसल्यामुळे उपचार करता येत नाहीत. हे रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात.

आटपाडी - सर्पदंशांवर शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा नसल्यामुळे उपचार करता येत नाहीत. हे रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांनाही आता सर्पदंशावरील लस उपलब्ध होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी यांची मागणी केली होती. तसा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय झाला.

चार-पाच वर्षांपासून आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी अनेक गावागावात व माळरानावर पोहोचले आहे. या टेंभूच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर विविध जातीचे विषारी सर्प मोठ्या प्रमाणावर तालुक्यात आलेत. त्यामुळे अलीकडे सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले असून काही जणांचा मृत्यू झाला, तर काही जणांना उपचारासाठी मोठा खर्च करावा लागला आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी ३० च्या दरम्यान सर्पदंशाचे रुग्ण आढळून येऊ लागलेत.

सर्पदंशावरील रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध केली जाते. तालुक्यात खरसुंडी, झरे, करगणी आणि दिघंची येथेही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होती. ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्यामुळे सर्पदंशाने बाधित झालेल्या रुग्णांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत होता.

मात्र खासगी रुग्णालयात सर्पदंशावरील सरकारी लस नसल्यामुळे उपचारासाठी मोठा खर्च रुग्णाला करावा लागत होता. त्यामुळे खासगी रुग्णालयात ही सर्पदंशावरील शासनाने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पडळकर यांनी केली होती.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णालयांना सर्पदंशावरील शासकीय लस उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT