garpeeth.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

गारपीट, वादळी पावसामुळे इतक्‍या एकरातील द्राक्षाचे नुकसान 

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपीट, वादळी पावसामुळे 550 एकरावरील द्राक्ष, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यात द्राक्षच्या पिकलेल्या काडांची पाने गळून पडली आहे. भविष्यात ही काडी पक्क न झाल्याने मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागणार आहे. बुधवारी ( ता. 3) आणि गुरुवारी ( ता. 4) जिल्ह्यात वादळी पावसाची शक्‍यता आहे. कृषी विभागाकडून पंचनामे गतीने सुरु आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलका पाऊस झाला. 


रविवारी दुपारी दीड ते सायंकाळी चारच्या वेळेत या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात पक्क झालेल्या द्राक्ष काड्यांना मोठे नुकसान झाले आहे. 450 एकरावरील काड्यांची पानेच गळून पडली आहेत. परिणामी काड्या पक्क न होता. भविष्यात फळधारणा न होण्याची भीती आहे. द्राक्ष व भाजीपाल्याचे अत्यंत नुकसान झालेले आहे. या शिवाय 50 एकरावरील ऊसाचेही नुकसान झालेले आहे. जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तिन्ही तालुक्‍यात कृषी सहाय्यक, तलाठ्यांकडून पिकांचे पंचनामे सुरु केले असून दोन दिवसात पंचनामे अंतिम होणार आहेत. 

विद्युत पुरवठा होवू शकतो खंडीत... 
हवामान खात्याने दिलेल्या धोक्‍यांच्या इशाऱ्यानुसार कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघर येथे चक्री वादळाची शक्‍यता आहे. याच काळात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्‍यता असून या काळात विद्युत पुरवठा दिर्घ काळ खंडीत होण्याचीही शक्‍यता आहे. या पार्ष्वभूमिवर ग्राहकांनी सर्व ती उपाय योजना करण्याचे आवाहन केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT