So many people return the district during the lockdown 
पश्चिम महाराष्ट्र

लॉकडाउन काळात तब्बल इतके लोक जिल्ह्यात दाखल

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोना लॉकडाउन काळात सांगली जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या 56 हजार, तर बाहेर जाणाऱ्यांची संख्या 1.40 लाखांवर गेली आहे. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्याशेजारील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पासेस देण्यात येणार आहेत. 

याबाबत माहिती देताना अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाउन जारी आहे. लॉकडाउनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत.

या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे, यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार दिनांक 4 जूनपर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या 1 लाख 40 हजार 691 इतकी असून, सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या 55 हजार 906 इतकी आहे.

यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 37 हजार 492 व्यक्ती आहेत, तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 1 लाख 3 हजार 199 व्यक्ती आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून येणाऱ्या 12 हजार 444 व्यक्ती आहेत, तर राज्यातील अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या 43 हजार 462 व्यक्तींचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : आवेश खानवर बंदीची कारवाई? अतिउत्साह महागात पडणार, लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज अडचणीत सापडणार

Gobar Tax: पाकिस्तानने गायी-म्हशीच्या शेणावरही लावला कर; जगभरात चर्चा, काय आहे गोबर टॅक्स?

Buldhana : अन्नातून विषबाधा, तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू; आईवर उपचार सुरु...

Latest Marathi News live Update : दिव्यांग उमेदवारांचे आंदोलन; भरतीतील अन्यायाविरोधात संताप, आंदोलकाचा मृत्यू

Pune News : अमली पदार्थांचे विक्रेते, पुरवठादार व सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर; पोलिस आयुक्तांनी घेतली झाडाझडती

SCROLL FOR NEXT