पश्चिम महाराष्ट्र

...तर त्या परिस्थितीत सर्व डॉक्‍टरांचे एकच हॉस्पिटल

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोनाचे रुग्ण पुढील वर्षभर आढळत राहतील. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रापुढे पुढील वर्षभरात मोठी संकटे येऊ शकतात. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास खासगी हॉस्पिटल्संना टाळे लावण्याचा सरकारचा इरादा आहे. अशाप्रसंगी रुग्णसेवा अखंडित सुरू ठेवण्यासाठी काय करता येईल यादृष्टीने अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांमध्ये विचारविनिमय सुरू असून कदाचित अनेक तज्ज्ञ एकत्र येऊन एकाच हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देऊ शकतात अशा अनेक पर्यायांचा विचार सुरू असल्याचे अस्थिव्यंगोपचार संघटनचे राज्य अध्यक्ष डॉ. अजित शिंदे यांनी "सकाळ'ला सांगितले.
एक मे रोजी या संघटनेचा स्थापना दिन आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या वतीने राज्यभर विविध उपक्रम सुरु आहेत. यंदा या स्थापना दिनाची संकल्पना म्हणून "आपण सर्व मिळून करू करोनाचा पराभव' करून अशी थीम निवडण्यात आली आहे.
डॉ.शिंदे म्हणाले,"" देशावर अभूतपूर्व अशी कोरोना आपत्ती आली आहे. अशा संकटाच्या प्रसंगी एकजूट दाखवून सर्वांना काम करावे लागेल. देश आणि राज्यभरातील सर्व अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ रुग्णसेवा-जागृतीसाठी सर्व पातळ्यांवर पुढे असतील. देशभरात 14 हजार तर राज्यात 2 हजारांवर अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ कार्यरत आहेत. ही सारीच मंडळी सध्याच्या आपत्तीत समाजासाठी योगदान देण्यास सज्ज आहेत. सभासदांसाठी वैद्यकीय परिसंवाद व परिषद, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या कार्यशाळा हा नित्य कामाचा भाग आहे. ऑर्थो टीव्ही या युट्युब चॅनेलद्वारे लाईव्ह वेबीनारसह, लाईव्ह शस्त्रक्रिया, तज्ज्ञांचे मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध असेल. फेसबुक लाईव्हसारखे उपक्रमही सतत सुरू असतात.''
ते म्हणाले,""समाजासाठी जोडून घेणारे अनेक उपक्रमही सुरू असतात. खेडोपाड्यापर्यंत जाऊन मोफत शस्त्रक्रिय-आरोग्य शिबिरांचे आयोजन, दिव्यांगांना मोफत उपचार, रस्ते अपघातातील रुग्णांना माणुसकीचा हात असे अनेक उपक्रम निरंतर सुरू आहेत. सध्याच्या टाळेबंदी आणि कोरोनाच्या आपत्तीत आणखी नव्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. उद्या आम्ही दिवसभर लॉकडाऊन पश्‍चात या साथीच्या आजारामध्ये वैद्यकीय क्षेत्रावर होणाऱ्या आर्थिक परिणामांचा ऊहापोह करण्यासाठी वेगवेगळी ऑनलाईन चर्चासत्रे घेत आहोत. तसेच जिल्हा संघटना रक्तदान शिबिरे, गरजूंना अन्नधान्य व उपयुक्त साहित्याचे वाटप, सर्व सामान्यांमध्ये या साथीच्या रोगाबद्दल जनजागृती असे अनेक उपक्रम राज्यभरात घेतील.''
.........
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT