Ajit Talekar 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आता हे गाव चर्चेत 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍याची राजधानी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या केमला नेहमीच वेगवेगळ्या कारणाने महत्त्व प्राप्त झालेले आहे. कुंकूचे कारखाने या केममध्ये आहेत. तालुक्‍याच्या राजकारणात नेहमीच केमला महत्त्वाचे स्थान होते. केमचे अनिरुद्ध कांबळे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने केम जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे. या निवडीमध्ये माजी सरपंच अजित तळेकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मोहिते- पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन "ते जे उमेदवार देतील त्याला पद,' असा शब्द पाटील यांनी त्यांना दिला. आणि त्यांनी दिलेल्या दोन्हीही उमेदवारांना पदे मिळाली आहेत. 

हेही वाचा : खरचं का... तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदासाठी पदाधिकारी देणार राजीनामे 
तळेकर यांच्या निर्णयाला महत्त्व 

जिल्हा परिषद व करमाळा पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी केम जिल्हा परिषद गट व केम पंचायत समिती गण हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले. त्यामुळे केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवता आली नाही. अजित तळेकर यांचे 20 वर्षांपासून वर्चस्व आहे. त्यांचे वडील दिलीप तळेकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तळेकर हे मोहिते-पाटील निष्ठावंत मानले जातात. मात्र, केम जिल्हा परिषद गट व केम पंचायत समिती गण येथील उमेदवार अजित तळेकर सांगतील तेच असतील, अशी भूमिका माजी आमदार नारायण पाटील यांनी घेतली. या निवडणुकीचे वेळी तळेकर यांच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले होते. तेव्हा अजित तळेकर यांनी जिल्हा परिषदेसाठी अनिरुद्ध कांबळे तर पंचायत समितीसाठी शेखर गाडे यांचे नाव सुचवले. हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने शेखर गाडे यांना करमाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी संधी मिळाली, तर जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आल्याने केम गटाचे अनिरुद्ध कांबळे यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे. त्यामुळे अजित तळेकर यांनी सुचवलेल्या एका उमेदवाराला पंचायत समितीचे सभापती पद मिळाले तर दुसऱ्याला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. 

हेही वाचा : झुंज संपली! पूरग्रस्तांना वाचवणाऱ्या मच्छीमाराच्या पत्नीचा अखेर मृत्यू 
तळेकारांवर का विश्‍वास 

तळेकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील यांना केम गटातून चांगले मताधिक्‍य दिले होते. त्यामुळे माजी आमदार पाटील यांचा त्यांच्यावर विश्‍वास वाढत गेला. केम गट आरक्षित झाला नसता तर तळेकर यांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी संधी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT