Solapur district politics in Mohite Patil active  
पश्चिम महाराष्ट्र

झेडपी अध्यक्षपदामुळे मोहितेंचे 'समाधान'? 

अशोक मुरूमकर

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी करमाळा तालुक्‍यातील केम गटाचे सदस्य अनिरुद्ध कांबळे यांची निवड झाली. कांबळे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे समर्थक असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. अध्यक्ष निवडीत त्यांना भाजप आघाडीने पाठिंबा दिला. त्यामुळे ते नेमके कोणाचे, असा एकीकडे प्रश्‍न केला जात आहे. तर दुसरीकडे, मात्र मोहिते-पाटील यांचा माणूस म्हणून भाजपने त्यांना पद देऊन मोहिते-पाटील यांचे समाधान केल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आता हे गाव चर्चेत 
भाजपचे सरकार आले असते तर... 

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला आणि माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे विजयी झाले. पुढे विधानसभा निवडणुकीतही भाजपने दिलेल्या उमेदवाराचाच त्यांनी प्रचार केला. दरम्यान, सर्वाधिक जागांवर विजय मिळवूनसुद्धा राज्यात भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन त्यांना रोखले. भाजपने सरकार स्थापन केले असते तर त्यांना काहीतरी मोठे पद मिळाले असते. त्यांना राज्यपाल, विधान परिषद आमदार किंवा राज्यसभेवर खासदार म्हणून कदाचित घेतले असते, अशी चर्चा होती. 
कांबळे हे माजी आमदार पाटील यांचे समर्थक आहेत. तर पाटील हे मोहिते-पाटील यांचे समर्थक आहेत. कांबळे यांना अध्यक्ष करण्यासाठी मोहिते-पाटलांशिवाय समाधान आवताडे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचेही योगदान आहे. मात्र, हे सर्व भाजपला मानणारे आहेत. 

हेही वाचा : मोठी बातमी : शिवसेनेत नाराजीचा स्फोट... 
मोहिते पाटलांचे विधान... 

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मी राष्ट्रवादीत असल्याचे वक्तव्य केले होते. जर पद नाही मिळाले आणि त्यांनी भाजपला सोडले तर भाजपचे जिल्ह्यात नुकसान होऊ शकते. त्यामुळे भाजपने त्यांच्या मर्जीतील सदस्याला अध्यक्ष केले, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कांबळे यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत मोहिते-पाटील यांची पुन्हा दमदार एंट्री होणार आहे. 

काबळेंचा थेट संबंध.... 
मोहिते-पाटील यांच्यासह परिचारक, राऊत व आवताडे यांनी मदत केली असली तरी कांबळे किंवा आमदार नारायण पाटील यांचा मोहिते-पाटील यांच्याएवढा कोणाशीही थेट राजकीय संबंध नाहीत. त्यामुळे इतरांनी पाठिंबा दिला असला तरी मोहिते-पाटील यांचाच अध्यक्ष झाला असल्याचे मानले जात आहे. 

रणजित मोहिते-पाटील यांचा पुढाकार 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अर्ज घेण्यापासून निवड होईपर्यंत ते उपस्थित होते. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवेळी ते उपस्थित होते. याबरोबर जिल्हा परिषदेत अर्ज दाखल करतेवेळी ते हजर होते. सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाही ते जिल्हा परिषदेत होते. जल्लोष सुरू झाल्यानंतर मात्र त्यांनी जिल्हा परिषद सोडली. मात्र, जल्लोषात त्यांनी अंगाला गुलाल लावून घेतला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT