पश्चिम महाराष्ट्र

क्षमता 141 अन् कैदी 408; सोलापूर कारागृहातील परिस्थिती

परशुराम कोकणे

सोलापूर : निधीअभावी शासकीय कामे अनेक वर्षे अपूर्ण राहिल्याचे आपण पाहतो, पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नाही. असाच प्रकार सोलापूर जिल्हा कारागृहाच्या बाबतीत झाला आहे. कारागृहातील नवीन बराकीचे बांधकाम निधीअभावी अर्धवट आहे. सध्याच्या कारागृहाची क्षमता 141 असून कैद्यांची (बंदी) संख्या 408 इतकी झाल्याचे समोर आले आहे. 

सोलापूर जिल्हा कारागृहातील बराकीची संख्या वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. अखेर शासनाने या कामाला मंजूर दिली. बांधकामासाठी निधीही उपलब्ध केला. थोडे थोडे करून नवीन बराकीचे 90 टक्के बांधकाम झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील लाइट फिटिंग, दरवाजे, खिडक्‍यांचे काम राहिले आहे. नवीन प्रशासकीय मान्यता आणि निधीची आवश्‍यकता आहे. 

उन्हाळ्यात उकाड्यामुळे बंदींना त्रास होऊ नये म्हणून जास्त पंखे लावण्यात आले आहेत. तसेच थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माझ्या कालावधीत नवीन बराकीचे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास कारागृह अधीक्षक सुनील कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

बराक वाढवून मिळण्यासाठी कारागृह प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला होता, नवीन बराक मंजूर झाली असून, जवळपास 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. नवीन बराक ही सध्याच्या कारागृहाच्या मागील बाजूस बांधण्यात आली आहे. तिला प्रवेशद्वार सध्याच्या कारागृहातूनच करण्यात येणार आहे. तेथील काम शेवटच्या टप्प्यात आले असून लवकरच ती वापरात येईल. नवीन बराकीमध्ये 350 बंदींची व्यवस्था असेल. ते काम पूर्ण झाल्यास ताण कमी होईल. 

- सुनील कुलकर्णी, कारागृह अधीक्षक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT