jk.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

'या' शहरातील मिश्रभाषेची नव्यांनाही पडतेय भुरळ 

सुष्मिता वडतीले

सोलापूर : सोलापूरच्या  विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेत त्या भागातील संस्कृतीची छाप आढळतेच. त्याची भुरळ नव्यांनाही पडत आहे.

सोलापुरी बोलीभाषेची अनेक रूपे मजेदार आहेत. त्यात 'बाकी बस निवांत... हे बग हे अलं... त्येबक ते आलं... तू आल्ला... जेव्लो.. जेव्ल्ये.. झोप्लो.. फेक्‍ला.. अल्ती.. अलावं.. गेलावं.. जेवलावं.. बसलावं... खाल्लावं.. आलो.. गेलो.. जात्तो.. गेल्तो.. व्हतो.. झ्झोपतो... येकिब्बे... जाकिब्बे... चल पळ.. तुला सकाळ धरनं कुणी भेटला नाही का... गप्प गुमान जा... अशी भाषा कानावर आली की बोलणारा अस्सल सोलापुरी आहे हे लक्षात येते. याची भुरळ आता सोलापुरात नव्याने आलेल्या लोकांनाही पडत आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर वसलेले सोलापूर शहर हे भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न तर आहेच. पण हा वेगळेपणा अधिक वैविध्यातून तर आला आहेच. त्याचबरोबर विविध भाषांच्या मिश्रणातून तयार झालेल्या खास सोलापुरी भाषेमुळेही आला आहे. मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू या चार भाषांचे लोक सोलापूर शहरात एकत्र राहत आहेत. सर्व भाषांतून तयार झालेली सोलापूरची भाषा गोड आहे. तसेच सोलापुरात आढळणारा रोखठोकपणाही त्यात दिसून येतो. 

सोलापुरी भाषेत अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने भाषा बोलल्या जातात. त्यात तो आला, तो गेला, तो म्हणाला या प्रमाणभाषेतील तो, सोलापुरात तेनं म्हणून येतो आणि आला गेला हे आलता गेलता बनून जातात. तसेच तेनं आलता, तेनं गेलता, तेनं म्हटलं असं सोलापुरात सर्रास बोललं जातं. कन्नड आणि तेलुगू भाषांचा प्रभाव पडल्याने सोलापुरातील मराठी अनेक अर्थाने वैशिष्टयपूर्ण बनली आहे. शिवाय सोलापुरात या दोन्ही भाषांवरही मराठीचा मोठा प्रभाव आहे. यात खास सोलापुरी म्हणून अशी एक वेगळी भाषा आहे.

सोलापुरी भाषेत हेलकारी शब्दांची योजना आहे. कन्नड आणि तेलुगू या भाषांचा हा परिणाम. कानडी भाषेत बंदिल्ला.. उन्दिल्ला.. बित्तील्ला.. होगील्ला.. अशी ल्ला युक्त भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कन्नड भाषकांच्या संपर्कामुळे सोलापुरी बोलीभाषेत हेलयुक्त रूपे आली आहे. त्यात तुमी कवा आलाव.. जेवलाव का नै.. च्या पिताव का.. जरा आराम करताव का.. पाणी प्या.. अजून काय फायजेल का वं.. अशा प्रकारे व चा प्रयोग सोलापूरकर करतात. कानडीच्या संपर्कामुळे ती प्रवृत्ती सोलापुरी मराठीत डोकावत आहे.

दरम्यान, खास सोलापुरी भाषेचा चेहरा मोहरा तयार झालेला आहे. तो खास अशासाठी की ही भाषा जशी ग्रामीण नाही, तशी तिचे एकंदरित संमिश्र स्वरूप आहे. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सोलापुरी भाषा बोलली जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ढगफुटीसारखा पाऊस, घरांमध्ये पाणी; नागपूरच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

एसटी स्मार्ट कार्डसाठी मोठा दिलासा! अर्जाची मुदत वाढवली; पण किती? जाणून घ्या नवी मुदत

WhatsApp Web वर आले 5 भन्नाट फीचर्स! ग्रुप व्हिडिओ कॉल ते QuickHD पर्यंत जाणून घ्या सर्व काही

Live Marathi News Update : राधानगरी धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांच्या पातळीपर्यंत पाणी

Teachers Rules: शिक्षकांची निवडणूक ड्युटी कधी लावता येते, कधी नाही? निवडणूक आयोगाने सांगितले नवे नियम; जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT