Solapur
Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा बोजवारा 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिकेचे आराखडे हे केवळ कागद रंगविण्यासाठी असतात, त्यानुसार कार्यवाहीसाठी नसतात हे शनिवारी पहाटे झालेल्या मध्यम पावसाने सिद्ध झाले.

महापालिकेनेच निश्‍चित केलेल्या संभाव्य आपत्तीसदृश स्थिती रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मुसळधार पाऊस झाला असता तर या परिसराला तलावाचे स्वरूप आले असते.

महापालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या आराखड्यानुसार शहरात नऊ ठिकाणी आपत्कालीन स्पॉट आहेत. या ठिकाणी मॉन्सूनपूर्व कामे नाही झाली तर मोठ्या प्रमाणात पाणी साचून आपत्ती निर्माण होऊ शकते. परिसरातील घरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी घुसून वित्तहानी होऊ शकते, असे या आराखडा पुस्तिकेतच नमूद केले आहे. मात्र, त्यानुसार कार्यवाही न झाल्याने आराखड्यातील तरतुदी व उपाय कागदावरच राहिले आहेत. 

संभाव्य आपत्ती स्थानांमध्ये सम्राट चौक रस्त्याचाही उल्लेख आहे. शनिवारी पहाटे झालेल्या पावसामुळे याच ठिकाणी पाणी साचले आहे. आराखड्यात नमूद केल्यानुसार मॉन्सूनपूर्व काळातच या परिसरात चर खोदणे, नाले सफाई करणे ही कामे झाली असती तर हे पाणी साचले नसते. मात्र, संभाव्य पूरस्थितीच्या कालावधीत जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवणे, आपत्ती उद्‌भवल्यास परिस्थितीला सामोरे जाऊन जीवित व वित्तहानी होणार नाही याची काळजी घेणे आणि प्रशासन, स्वयंसेवी संस्था व जनसहभागातून आपत्तीला तोंड देणे हे मुद्दे कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पाणी थांबणाऱ्या ठिकाणांची यादी केली जाते. तेथील पाण्याचा निचरा करण्याचेही काम होते. मात्र, काही वेळा कचरा अडकून आणि माती जाऊन पाणी जाण्याची तोंडे बंद होतात. पावसानंतर हे दिसून आले की संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी जाऊन कचरा आणि माती काढून मार्ग मोकळा करते. 
- संदीप कारंजे, नगर अभियंता, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT