Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

'स्पॉट फाईन' योजनेचे खासगीकरण 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत नगरविकास विभागाने स्वच्छता न पाळणाऱ्यांसाठी महापालिकानिहाय दंडाची अंतिम रक्कम निश्‍चित केली आहे. सोलापूर महापालिकेच्या क्षेत्रात उघड्यावर शौच केल्यास 500 तर थुंकल्यास 100 रुपये दंड होणार आहे. पूर्वी हा दंड आकारण्याचे अधिकार फक्त महापालिकांना होते, ते आता खासगी संस्थांनाही देण्याची तरतूद करत  शासनाने या योजनेचे खासगीकरणच केले आहे. 

महापालिका अधिनियमात दंड करण्याची तरतूद पूर्वीपासून आहे. परंतु, दंडाची रक्कम निश्‍चित नसल्याने राज्यातील प्रत्येक महापालिका आपल्या स्तरावर याबाबत निर्णय घेऊन दंडाची रक्कम ठरवत होते. त्यामुळे राज्यातील महापालिकांत दंडाच्या रकमेबाबत सुसूत्रता नव्हती. काही ठिकाणी या अधिकाराचा गैरवापर झाल्याचे समोर आले होते. आता राज्यातील महापालिकांसाठी दंडाची रक्कम निश्‍चित करून दिल्याने सुसूत्रता येणार आहे. 

"कचरा लाखमोलाचा' ही मोहीम मेपासून महापालिकांत राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे विलगीकरण होत आहे. ज्या भागात नागरिकांचा स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत नाही, त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचनाही महापालिकांना देण्यात आली आहे. 

आकडे बोलतात... 
असा होईल महापालिकेच्या वर्गवारीनुसार अंतिम दंड (रुपयांत) 

--------------------------------------------------------------------
कृती अ आणि ब वर्ग क आणि ड वर्ग 
---------------------------- ------------------------------------------------ 
रस्ते/मार्गावर घाण करणे 180 150 
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 150 100 
उघड्यावर लघुशंका करणे 200 500 
उघड्यावर शौच करणे 500 500

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT