Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

तीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील उत्सुकताही आता संपत आली आहे. दरम्यान, फेब्रुवारीत याचा काहीतरी निकाल लागेल या अपेक्षेने फेब्रुवारीची नियमित सभा उशिरा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या महापालिका सभेत सदस्य निवडीसंदर्भात विषय येऊ शकतो. महापालिका स्थायी समिती सभापती पदाचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. गेल्या वर्षभरात समितीची एकही सभा झाली नाही. त्यामुळे या समितीत पहिल्यांदाच आलेल्या सदस्यांना समितीच्या कामकाजात सहभागी होता आले नाही. दरम्यान, हे प्रकरण दाखल झाल्यापासून तीन न्यायाधीश बदलले, मात्र अद्याप निकाल लागला नाही, असे सांगण्यात आले. 

स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने गेल्या वर्षभरात महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयाचे सर्व प्रस्ताव आयुक्तांमार्फत थेट सर्वसाधारण सभेकडे आले. त्यामुळे सुरवातीच्या कालावधीत अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिले. त्याबाबत काही प्रमाणात टीका सुरू झाल्यावर सर्व प्रलंबित विषय मंजूर करून घेऊन महापौर शोभा बनशेट्टी यांनी एक प्रकारे विक्रमच केला आहे. स्थायी समिती सभापतीचा वाद न्यायप्रविष्ठ राहिला तरी सदस्य निवडीची प्रक्रिया नगरसचिव कार्यालयाकडून सुरू होणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरूही झाली आहे. सहा मार्चच्या अगोदर रिक्त जागा भरणे आवश्‍यक आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेर नियुक्ती करावी लागणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पाहता या नियुक्‍त्या जास्तीत जास्त उशिरा कशा करता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपच्या वतीने राजेश काळे, संतोष भोसले आणि अविनाश बोमड्याल हे स्थायी समितीत जाण्यासाठी इचछुक आहेत. 

जानेवारीअखेर आणखी एक सभा 
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विकासकामासंदर्भातील प्रस्ताव प्रलंबित राहू नयेत यासाठी महापालिकेची आणखी एक सभा या महिनाअखेर बोलावण्याचे नियोजन सुरू आहे. 25 किंवा 30 जानेवारीला सभा होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT