Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर : आठ प्रभाग समितींच्या रचनेवर शासनाचे शिक्कामोर्तब 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : गेल्या 13 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका प्रभाग समितीच्या स्थापनेला राज्य शासनाने अखेर हिरवा कंदील दाखविला असून, नऊऐवजी आठ समित्या स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. तथापि, या संदर्भात काही म्हणणे सादर करणे असल्यास ते 30 दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

महापालिकेच्या झोन निर्मितीचा प्रस्ताव 13 ऑक्‍टोबर 2017 च्या सभेत चर्चेला आला. प्रत्यक्षात 9 जानेवारी 2018 रोजी  नउ समित्यांचा  ठराव झाला. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ही रचना चुकीची असल्याचे कारण देत आयुक्तांनी प्रशासनाने सुचविल्यानुसार आठच प्रभाग समित्या स्थापन करण्याची शासनाकडे शिफारस केली व सभेचा ठराव विखंडित करण्याचे पत्र दिले. 

महापालिकेच्या 26 प्रभागांमध्ये एकूण 102 सदस्य आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी विभागीय कार्यालयाची प्रभागानुसार रचना करावी लागणार असल्याने अधिनियममधील कलम 29 अ (1) नुसार 4.5 लाख ते 12 लाख लोकसंख्येसाठी किमान चार व कमाल नऊ विभागीय कार्यालये करण्याबाबत तरतूद आहे. त्यानुसार सभागृहाने ठराव केला होता. 

ज्या शहराची लोकसंख्या नऊ ते 12 लाख आहे त्या शहरात कमीत कमी चार ते जास्तीत जास्त नऊ समित्या करता येतात. सध्या असलेल्या संख्येनुसारच प्रशासनाने आठ समित्यांचा प्रस्ताव पाठविला होता. सर्वांत मोठी झोन समिती क्रमांक सात, त्यामध्ये 15 नगरसेवक, तर सर्वांत लहान समिती क्रमांक तीन असून त्यामध्ये 12 नगरसेवक प्रस्तावित होते. त्यानुसार समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. 

झोन समिती संभाव्य समाविष्ट प्रभाग 
01 1 ते 3 
02 4,5 व 7 
03 6,15,22,23 
04 10 ते 12 
05 8,9,13 
06 14,16,17 
07 18 ते 21 
08 24 ते 26 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT