devendra fadnavis
devendra fadnavis 
पश्चिम महाराष्ट्र

नाभिक समाजाने मुख्यमंत्री फडवणीसांचा केला निषेध 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामा शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत सोलापुरातील संत सेना नाभिक दुकानदार संघाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा जाहीर निषेध केला. या निषेधाचे पत्र संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज (शनिवार) जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

यापूर्वी सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारची कार्यपद्धती सांगण्यासाठी नाभिक समाजातील व्यावसायिक हे जसे गिऱ्हाईक टिकविण्यासाठी प्रत्येकाचे अर्धी दाढी, अर्धी मिशी कट असे अर्धे अर्धे काम करतात तसे मागील सरकारने कार्य केल्याचे उदाहरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिले होते. या वाक्‍याचा नाभिक समाजाने तीव्र निषेध केला असून नाभिक आपण सांगत आहे तसेच कार्य करत असेल तर ते नाभिक समाजाला सिद्ध करून दाखविण्याचे आव्हानही संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे. 

यावेळी संतोष धोत्रे, ऍड. विकास तिऱ्हेकर, गोवर्धन कोडपाक, शरणू हडपद, श्रीनिवास रासकोंडा, सुधीर वड्डेपल्ली, कृष्णा सिंगलराज, मोहन जमदाडे, राकेश सिंदगीकर, नरहरी रायचुरकर, श्रीकांत राऊत, मनीष गंजाळकर यांच्यासह नाभिक समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT