insurance fraud
insurance fraud  
पश्चिम महाराष्ट्र

निवृत्त कृषी अधिकाऱ्याला एक कोटीचा गंडा

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - वेगवेगळ्या कंपनीच्या विमा पॉलिसी काढून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त कृषी अधिकाऱ्याची 1 कोटी 4 लाख 86 लाख 470 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला आहे. विमा पॉलिसीची आणि संबंधित व्यक्तींची कोणतीही खात्री न करता बॅंकांच्या खात्यावर सात वर्षे पैसे भरल्याने ही घटना घडली असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. 

सखाराम यल्लप्पा केसकर (वय 64, रा. सुरवसे नगर, कुमठा नाका, नई जिंदगी रोड, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या निवृत्त कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. विराज मल्होत्रा (रा. गुडगाव, नोईडा, दिल्ली), सुमीत रंजन, आकाश बिडला, सुमीत अग्रवाल, अंजली शर्मा, आरती नारंग, रिचा भटनागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 2011 पासून आजवर ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसकर यांना बिर्ला सनलाईफ, श्रीराम लाइफ इन्शुरन्स, भारती एक्‍सा लाइफ इन्शुरन्स या कंपनीच्या तीन पॉलिसी आरोपींनी काढून दिल्या. केसकर यांनी पॉलिसी सुरू करतानाची रक्कम आणि हप्ते म्हणून महाराष्ट्र बॅंक, आयसीआयसीआय बॅंक व स्टेट बॅंक ऑफ ऑफ इंडिया, सिंडिकेट बॅंकेत धनादेश, डीडी आणि रोख स्वरूपात एकूण 1 कोटी 4 लाख 86 लाख 470 रुपये भरले. 

आरोपींनी इन्शुरन्स कस्टमर बोनस डिपार्टमेंट या खात्याच्या नावाने पॉलिसी मॅच्यूअर झाली आहे असा खोटा ई-मेल केसकर यांना पाठविला. त्यानंतर पॉलिसीबाबत खात्री करण्यासाठी केसकर हे हैदराबाद येथील भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात गेले. आम्ही अशा प्रकारचा ई-मेल तुम्हाला केलाच नाही, ही माहिती खोटी आहे असे सांगण्यात आले. विमा पॉलिसीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे केसकर यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. या गुन्ह्याचा तपास सोलापूर पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन थेटे तपास करीत आहेत. 

आरोपींनी सखाराम केसकर यांना विमा पॉलिसी काढून दिल्या. तसेच केसकर यांनी स्वत:हून पूर्वी काढलेल्या पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठी म्हणून ऑनलाइन पैसे मागवून घेतले. खात्री न करता आर्थिक व्यवहार केल्याने ही फसवणूक झाली आहे. नागरिकांनी अशाप्रकारे आर्थिक व्यवहार करताना विचार करावा. 
- नितीन थेटे, 
सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT