खासदार ऍड. शरद बनसोडे
खासदार ऍड. शरद बनसोडे 
पश्चिम महाराष्ट्र

मी आहे वाघ... वाघाशीच लढणे मला आवडेलः खासदार बनसोडे

विजयकुमार सोनवणे

सोलापूर: "मी वाघ आहे....वाघाशीच लढणे मला आवडेल. आगामी लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हेच माझे प्रतिस्पर्धी असतील'', असे खासदार ऍड. शरद बनसोडे यांनी "सकाळ'ला सांगितले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा श्री. शिंदे यांनीच लढवावी असा आग्रह कॉंग्रेस कार्यकर्त्यातून होत आहे. त्यावर "आता माझी रिटायरमेंट आहे. त्यामुळे नव्यांनी पुढे यावे'', असे वक्तव्य श्री. शिंदे यांनी सोलापूर दौऱ्यात केले होते. या पार्श्‍वभूमीवर ऍड. बनसोडे यांना विचारले असता ते म्हणाले, "मी स्वतःला वाघ समजतो आणि माझी लढाई एका वाघाशीच होईल याची मला खात्री आहे. त्यांनी "रिटायरमेंट'ची घोषणा केली असली तरी पक्षश्रेष्ठी व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते रिंगणात उतरतील. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्री. शिंदे हेच माझे प्रतिस्पर्धी असतील.''

जे लढाऊ आहेत, संघर्ष करणारे आहेत त्यांनी आता पुढे आले पाहिजे. आपल्या मतदारसंघातील समस्या व बाजू जे आक्रमकपणे लोकसभेत मांडतील त्यांनाच निवडून देण्याची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे, या शिंदे यांच्या भूमिकेबाबत ऍड. बनसोडे म्हणाले,""श्री. शिंदे यांनी अपेक्षित धरलेला उमेदवार कॉंग्रेसमध्ये कोण आहे? त्यामुळे त्यांनाच निवडणूक लढवावी लागेल हीच  जास्त शक्‍यता आहे.''

वादच नाही, तर मिटण्याचा प्रश्‍न येतोच कुठे
पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. त्यामुळे ते मिटण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यांच्यातील वाद फक्त माध्यमांनाच दिसत आहे, प्रत्यक्षात तसे काही नाही, असे स्पष्टीकरणही ऍड. बनसोडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT