पश्चिम महाराष्ट्र

ऑनलाइन सर्व्हर डाउनचे ग्रहण सुटेना 

तात्या लांडगे

सोलापूर - कर्जमाफी, तूर-हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरतानाच ऑनलाइन सर्व्हर डाउन होतोय. त्यामुळे मागील वर्षभरात अनेक शेतकऱ्यांना लाभापासून मुकावे लागले आहे. सध्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत अर्ज भरण्याची मुदत 24 जुलैपर्यंतच आहे. आता ऑनलाइन सातबारा मिळतोय मात्र, विम्याचा सर्व्हर डाउन झाल्याने राज्यातील 72 लाख शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

खरीप हंगामात सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग यासह अन्य पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. या वर्षी आतापर्यंत सुमारे 11 लाख शेतकऱ्यांनी बॅंका, ई-महासेवा आणि सीएससी (सार्वजनिक सुविधा) केंद्रांवर अर्ज भरल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. बॅंकांकडून कर्ज घेण्यासाठीही वेळेवर सातबारा शेतकऱ्यांना मिळत नाही; तसेच कृषी व जिल्हा परिषदेच्या योजनांचे लाभार्थी ऑफलाइनच्या तुलनेत घटले असून ऑनलाइनच्या घोळामुळेच कर्जमाफीला विलंब लागत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. 

मागील चार-पाच महिन्यांपासून ऑनलाइनची यंत्रणाच कोलमडली आहे. कर्जमाफीतही अशीच समस्या उद्‌भवली होती. त्यामुळे शेतकरी आणि सीएससी केंद्र चालकांमध्ये वादावादी होत आहे. पीकविम्याचा सर्व्हर डाउन असल्याने लाखो शेतकरी अर्ज भरण्याची प्रतीक्षेत आहेत. 
- साजिद आतार, समन्वयक, सीएससी केंद्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT