Name * 0corona_498.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

चिंता वाढली! जिल्ह्यात बुधवारी सापडले 40 कोरोना पॉझिटिव्ह; मार्डीत 15 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात बुधवारी (ता. 1) 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण अक्‍कलकोट शहरातील बुधवार पेठेतील आहे. आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 401 झाली असून त्यापैकी 154 रुग्ण बरे झाले आहेत. 

आतापर्यंत सोलापूरच्या ग्रामीण भागातील चार हजार 50 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी 401 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून अद्याप रुग्णांच्या संपर्कातील 48 संशयित व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील एक हजार 755 व्यक्‍तींना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. तर संस्थात्मक विलगीकरण कक्षात एक हजार 145 जणांना ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 18 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अद्याप 229 रुग्ण कोरोनाशी दोन हात करीत आहेत. 

जिल्ह्यातील रुग्णसंख्या 401 झाली 
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. 1) तब्बल 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामध्ये उत्तर सोलापुरातील मार्डीत सर्वाधिक 15 तर बाणेगावात दोन, नवीन विडी घरकुलात पाच, अक्‍कलकोट शहरात सात रुग्ण आढळले. तसेच मोहोळ तालुक्‍यातील आष्टी, पंढरपूर शहरात दोन, गणेश नगरात एक, तर पंढरपूर तालुक्‍यातील शेगाव दुमाला, गणेश नगर, पंढरपुर तालुका पोलिस ठाण्यामागे, दक्षिण सोलापुरातील कुंभारी, लिंबीचिंचोळी, होटगी स्टेशन, बक्षीहिप्परगा, मोहोळमधील महेबूब नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यामुळे आता सोलापुरच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 401 झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

SCROLL FOR NEXT