10 percent police cover for Ashadi Wari this year as compared to every year 
सोलापूर

दरवर्षीच्या तुलनेत यंदा आषाढी वारीसाठी 10 टक्केच पोलिस बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : यंदाचा आषाढी पालखी सोहळा आणि आषाढी यात्रा रद्द झाली आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला आहे. तरीही पंढरपुरात वारीसाठी भाविकांनी येऊ नये यासाठी मंदिर आणि शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी सहा पोलिस अधीक्षकांसह 100 अधिकारी आणि एक हजार 100 पोलिस पाचारण करण्यात येणार आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा फक्त 10 टक्केच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा प्रमुख पालख्यांसह अनेक संतांचे पायी पालखी सोहळे रद्द करण्यात आले आहेत. याबरोबरच 1 जुलै रोजीची आषाढी यात्रा देखील प्रथमच रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी आषाढी यात्रेसाठी 15 दिवस आधी पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेचा आढावा घेऊन नियोजन केले जाते. 
यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 500 हून अधिक अधिकारी आणि पाच हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी येतात. यात्रेपूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक देखील येऊन विठ्ठल मंदिर आणि पंढरपूर शहरातील सुरक्षेचा आढावा घेतात. 
यात्रेच्या निमित्ताने अनेक नवीन पोलिस खात्यात भरती झालेले अधिकारी आणि पोलिस कर्मचारी खास देवाची सेवा म्हणून बंदोबस्ताचे काम मागून घेतात. 
यंदा, मात्र कोरोनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात येणाऱ्या पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांची आषाढी वारी चुकणार आहे. यात्रा रद्द झाल्याने या वर्षी केवळ 100 अधिकारी आणि एक हजार 100 पोलिस आणि गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT