सोलापूर

या जिल्ह्यातील प्राथमिकच्या शिक्षकांना मिळणार 11 कोटी 62 लाख 

संतोष सिरसट

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील डीसीपीएस (अंशदायी पेन्शन योजना) धारक प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मागील वर्षी पहिला हप्ता देण्यात आला आहे. येत्या जुलै महिन्यात दुसरा हप्ताही दिला जाणार आहे. दुसऱ्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील 2410 शिक्षकांना 11 कोटी 62 लाख 43 हजार 266 रुपये मिळणार आहेत. 

राज्यातील कर्मचाऱ्यांना एक एप्रिल 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर डीसीपीएस धारक शिक्षकांना फरकाची रक्कम पाच समान हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मागील वर्षीपासून फरकाची रक्कम शिक्षकांना दिली जात आहे. जिल्ह्यातील 2410 शिक्षकांना मागील वर्षी 11 कोटी 62 लाख 43 हजार 266 रुपये सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची म्हणून देण्यात आली आहे. तेवढीच रक्कम यंदाच्या वर्षीही शिक्षकांना दिली जाणार आहे. 

डीसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी असी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्याच्या सूचना दिल्या आहेत. माळशिरस तालुक्‍यात प्राथमिक शिक्षकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या शिक्षकांना मिळणारी रक्कमही जास्त आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा; पुढील ६० ते ७२ तासांत तापमानात मोठी वाढ

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT