Sugar Factory 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील अडचणीतील सहा साखर कारखान्यांना 114 कोटींची थकहमी मंजूर 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांना राज्य शासनाने थकहमी मंजूर केली आहे. शासनाच्या या मदतीमुळे पंढरपूर, माळशिस, माढा आणि मंगळवेढा येथील सहा साखर कारखान्यांना 114 कोटी 67 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. 

दरम्यान, भाजप नेते कल्याणराव काळे आणि धनंजय महाडिक यांच्या कारखान्याला हमी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आमदार भालके यांना यश आले आहे. मागील वर्षी दुष्काळ आणि आर्थिक अडचणीमुळे पंढरपूर येथील विठ्ठल, सहकार शिरोमणी, माढा तालुक्‍यातील कूर्मदास हे साखर कारखाने बंद होते. या कारखान्यांना यावर्षी गाळप हंगाम सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. परंतु मागील वर्षीची एफआरपीची थकीत रक्कम आणि विविध बॅंकांची थकलेली कर्जे यामुळे नवीन कर्जे मिळण्यास अडचणी होत्या. 

शेकतरी हिताचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील 32 कारखान्यांसह सोलापूर जिल्ह्यातील आमदार भालकेंच्या विठ्ठल (30 कोटी 98 लाख), भाजप नेते कल्याणराव काळेंच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे (14 कोटी 52 लाख), धनंजय महाडिकांच्या भीमा (20 कोटी 22 लाख), शिवसेना नेते समाधान आवताडेंच्या संत दामाजी (10 कोटी 58 लाख), धनाजी साठेंच्या कूर्मदास (5 कोटी 15 लाख) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार महर्षीला (33 कोटी 24 लाख) या कारखान्यांना राज्य शासनाने 114 कोटी 67 लाख रुपयांची हमी दिली आहे. 

यासंदर्भात काल (ता. 9) राज्य शासनाच्या वित्त आणि सहकार वस्त्रोद्योग विभागाने अद्यादेश काढला आहे. राज्य शासनाने थकहमी दिली असली तरी संबंधित बॅंकेला कर्ज वसुलीचे अधिकार दिले आहेत. घेतलेल्या कर्ज फेडीसाठी संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळाची सामूहिक जबाबदारी देखील यामध्ये निश्‍चित केली आहे. 

"विठ्ठल'ला शेवटची संधी 
पंढरपूर येथील विठ्ठल आणि पुणे जिल्ह्यातील भोर येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाने (2019-20) गाळप हंगामासाठी अनुक्रमे 12 कोटी व 60 कोटी रुपयांच्या अल्पमुदत कर्जास शासनाने हमी दिली आहे. दोन्ही कारखान्यांनी शासन हमीवर घेतलेल्या कर्जाची व्याजासह सप्टेंबर 2021 पर्यंत परतफेड करणे आवश्‍यक आहे. या मुख्य अटीवरच या दोन्ही साखर कारखान्यांना 2020-21 ची थकहमी देण्यात आली आहे. मंजूर झालेले कर्ज थकले तर यापुढे या कारखान्यांना हमी देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. 

सर्वाधिक हमी अकलूजच्या "सहकार महर्षी'ला 
जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांना 114 कोटी 76 लाखांच्या कर्जाला राज्य शासनाने हमी मंजूर केली आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील या साखर कारखान्याला राज्यात सर्वाधिक 33 कोटी 24 लाख रुपयांची हमी मंजूर केली आहे. त्या खालोखाल आमदार भालकेंच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 30 कोटी 98 लाख रुपयांची हमी मंजूर झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT