सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात 125 नवे कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 125 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज 248 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. कोरोनामुळे आज पुन्हा एकदा आठ जणांचा बळी गेला आहे. 

आज एक हजार 402 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 277 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 28 हजार 702 एवढी झाली आहे. याशिवाय 803 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही तीन हजार 970 जण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत तर 20 हजार 929 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे. आज तरंगफळ (ता. माळशिरस) येथील 66 वर्षाचे पुरुष, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षांची महिला, सिद्धार्थनगर माळशिरस येथील 71 वर्षाची महिला, स्टेशन रोड पंढरपूर येथील 65 वर्षाची महिला, जवळा (ता. सांगोला) येथील 72 वर्षाचे पुरुष, शितल शहा हॉस्पिटल जवळ पंढरपूर येथील 46 वर्षाचे पुरुष, डोरले गल्ली मंगळवेढा येथील 68 वर्षाचे पुरुष, होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 45 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT