corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 128 नवे कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 3 हजार 192 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 हजार 64 अहवाल निगेटिव्ह आले असून 128 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी 101 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दोघांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 58 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 37 हजार 199 झाली आहे. त्यापैकी 35 हजार 85 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एक हजार 20 जण सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे 1 हजार 94 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील कान्हापुरी येथील साठ वर्षिय महिला आणि माळशिरस तालुक्‍यातील दहिगाव येथील 63 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RR Live: वैभव सूर्यवंशी vs जसप्रीत बुमराह... लढत पाहण्यासाठी उत्सुक आहात, पण सामना होणार की नाही? हे आधी घ्या जाणून

कोकणातला असूनही मला 'दशावतार'मध्ये घेतलं नाही कारण.... दिगंबर नाईक स्पष्टच बोलले, 'जे बघून लहानाचे मोठे...

Stock Market Today: घसरणीनंतर बाजार तेजीत बंद! कोणते शेअर्स वाढले? बँकिंग शेअर्स घसरले; खरेदीची हीच वेळ?

लव्ह जिहादचे आरोप करणाऱ्या 'मिस इंडिया अर्थ' सायलीचं अपहरण, पुण्यात हिंदू धर्मात केलेलं शुद्धीकरण, आता अचानक झाली गायब

IPL 2026: अर्जुन तेंडुलकरचे परफेक्ट यॉर्कर्स; रिषभ पंतलाही फलंदाजी करताना दिला त्रास; पाहा Video

SCROLL FOR NEXT