सोलापूर

वाळूमाफीयांवर धडक कारवाई करत चार महीन्यात केल्या 14 बोटी नष्ट 

अण्णा काळे

करमाळा(सोलापूर): तालुक्‍यात महसुल विभागाने गेली चार महिन्यात वाळूमाफीयांवर जोरदार कारवाई केली आहे. ही कारवाईमुळे वाळूमाफीयांवर चाप बसला आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान कारवाई करत 23 लाख 93 हजाराचा दंड वसूल केला आहे. एकूण 15 वाळू साठ्यावर छापा टाकून महसुल प्रशासनाने 35.24 लाख दंड आकारला आहे. तसेच सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

करमाळा तालुक्‍यात भीमा आणि सीना या दोन मुख्य नद्या आहेत. या शिवाय इतर लहान मोठ्या नद्या व ओढे आहेत. मात्र, कोठेही वाळू उपशाला परवानगी नाही. तरीही बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत आहे. सीना नदीला आता पाणी असल्याने वाळू उपसा बंद आहे. मात्र, पाणी येण्याआधी रात्री वाळू उपसा केला जात होता. यातूनच तरटगांव येथे महसुल प्रशासनाने कारवाई केली आहे. 

भीमा नदीवर कात्रज, जिंती, टाकळी, कोंढारचिंचोली, वांगी, कंदर, वांगी, चिखलठाण, उंदरगांव, वाशिंबे आदी भागात अधुनमधुन वाळू उपसा होत आहे. हा वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. 
उजनी परिसरात भीमा नदी पाञात महसुल विभागाने सर्वाधिक कारवाई झाली आहे. येथे नदीत बोटी टाकून वाळू उपसा होत होता. त्यामुळे काही बोटी नष्ट केल्या आहेत तर काही बोटी पाण्यात बुडवल्या आहेत. वाळू उपसा करणा-या बोटी पकडण्यासाठी तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. या भागातील वाळू उपसा बंद व्हावा म्हणून पोलिसही प्रयत्न करत आहेत. यातूनच दोन दिवसांवूर्पी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पथकाने जोरदार कारवाई केली आहे. 

दंड व वाळू जप्ती वाढली 
महसुल प्रशासनाने तहसीलदार समीर माने यांच्या नेतृत्वाखाली ढोकरी, कंदर, जिंती, दहिगाव, चिखलठाणमध्ये कारवाई करत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या 14 बोटी नष्ट केल्या आहेत. तर तालुक्‍यात 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान 104 ब्रास वाळू जप्त केली आहे. यात 12 वाहनांवर त्यांनी कारवाई केली आहे. त्यात 23.93 लाख दंड वसुल केला आहे. तर वाळुसाठ्यावर कारवाई करून यामध्ये 35.24 लाख दंख आकारला आहे. त्यापैकी 1.64 लाख रुपये दंड वसूल केला आहे. 

चोरीची माहिती नागरिकांनी द्यावी 
वाळू चोरी थांबवण्यासाठी आमचे कायम प्रयत्न सुरू असतात. त्यातूनही कोणीतरी राञीअपराञी वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करतेच. त्यावर आम्ही कारवाई करतो. ज्या भागात वाळु उपसा होत असला त्या भागातील सरपंच व इतर कोणत्याही नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. 

- समीर माने, तहसीलदार, करमाळा 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT