corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 144 कोरोनाबाधित चार जणांचा मृत्यू ; 93 जण झाले कोरोनामुक्त

प्रमोद बोडके

सोलापूर : ग्रामीण भागात गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 986 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 842 अहवाल निगेटिव्ह आले असून 144 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालाच्या एकाच दिवशी 93 कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना चाचणीचे 58 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील अकरा हजार 828 जण सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 हजार 610 जणांना सध्या इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 35 हजार 103 झाली आहे. आजपर्यंत ग्रामीण भागातील 1 हजार 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

रुग्णालयात सध्या 1 हजार 810 ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 32 हजार 263 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या अहवालामध्ये मृत्यू दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरसमधील 55 वर्षीय महिला व 85 वर्षीय पुरुष, पंढरपूर मधील गडम बिल्डींग मधील 71 वर्षिय पुरुष व करमाळा तालुक्‍यातील सालसे येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT