karmala sakal
सोलापूर

मनोहर भोसलेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

भोसलेला जामीन मंजूर व्हावा यासाठी बार्शी सत्र न्यायालयात जाणार

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव (ता. करमाळा) येथील बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या मनोहर भोसलेला शुक्रवारी (ता. 1) करमाळा न्यायालयाने 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले होते. भोसले यास ता. 19 सप्टेंबर रोजी करमाळा पोलीसांनी अटक केली होती.गेली

दहा दिवसांपासून करमाळा पोलिस ठाण्यात अटकेत आहे. शुक्रवारी ता.1 रोजी करमाळा पोलिसांनी तपासासाठी सात दिवसाची वाढीव पोलिस कोठडी मागितली होती. बारामती येथील न्यायालयातून न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी भोसलेला ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता.

पहिल्यांदा पोलिस कोठडीत असताना भोसले आजारी पडल्याने चार दिवस पोलिसांना तपास करता आला नाही. त्यानंतर दुस-यांदा चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयात उभे केले.तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे पुन्हा पोलिस कोठडीची मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली.

भोसलेचे वकील ऍड. राहुल गायकवाड यांनी तपास अधिकारी हे वेळ मारून नेत आहेत, असे सांगत तेच तेच कारणे पुढे करत असल्याचा युक्तीवाद केला. सर्व बाबींचा विचार करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. घोडके यांनी भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

भोसलेला जामीन मंजूर व्हावा यासाठी पुढील सुनावणीसाठी आपण बार्शी येथील सत्र न्यायालयात जाणार आहे, असेही आरोपीचे वकील ऍड. गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT