2Corona_20Sakal_20times_4.jpg
2Corona_20Sakal_20times_4.jpg 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 151 पॉझिटिव्ह; आठ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांत आज 151 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रूग्णसंख्या चार हजार 94 झाली आहे. लिंबिचिंचोळी (दक्षिण सोलापूर), पंढरपुरातील कोर्टी, नान्नज, वडाळा, अक्‍कलकोटमधील इंदिरा नगरातील, करमाळ्यातील फंड गल्ली, माढ्यातील लऊळ, बार्शीतील आडवा रस्ता येथील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

अक्‍कलकोटमधील सुभाष गल्ली, काझिकणबस, सुलेरजवळगे, तडवळ येथे प्रत्येकी एक, बार्शीतील आडवा रस्ता, आझाद चौक, भोगेश्‍वरी मंदिराजवळ, दत्त नगर, लातूर रोड, नागणे प्लॉट, स्वयंवर कार्यालयाजवळ, भालगाव, भोयरे, बोरगाव झाडी, चिंचोली, हात्तीज, खामगाव, तांबेवाडी येथे प्रत्येकी एक, वैरागमध्ये 18, आगळगाव आणि झाडबुके मैदान येथे प्रत्येकी चार, उपळाई रोड, टिळक चौक येथे प्रत्येकी तीन, सुभाष नगरात दोन, सोलापूर रोड परिसरात पाच, खानापूर रोड, गवळी गल्ली, लहुजी चौक येथे प्रत्येकी दोन, बेदराई गल्लीत चार रुग्ण सापडले आहेत. करमाळ्यातील फंड गल्ली, सुमंत नगरात प्रत्येकी एक, कानड गल्लीत पाच, श्रावण नगरात दोन, माढ्यातील कुर्डूत एक, लऊळमध्ये 20 रुग्ण आढळले आहेत. माळशिरसमधील अकलूजमध्ये चार, माळखंबी, वेळापुरात प्रत्येकी एक, नातेपुते येथे दोन, तर मंगळवेढ्यातील डोरले गल्लीत एक, तुकाई नगरात दोन, मोहोळ तालुक्‍यातील पेनूरमध्ये एक, वडवळमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. उत्तर सोलापुरातील नान्नज, वडाळा येथे प्रत्येकी एक, पंढरपुरातील अनिल नगर, भोसले चौक, गोविंदपुरा, कालिकादेवी मंदिर चौक, काशी कापड गल्ली, खवा बाजार, पंचमुखी मारूती मंदिराजवळ, विवेकविर्धनी शाळेजवळ, उत्पात गल्ली, झेंडे गल्ली, खेड-भोसे, सरकोली येथे प्रत्येकी एक, लक्ष्मी टाकळीत दोन, संत पेठेत तीन, सांगोला रोड दोन, राऊत मळा, इसबावी येथे प्रत्येकी तीन रुग्ण सापडले. सांगोल्यातील कुंभार गल्ली, साळुंखे वस्ती येथे प्रत्येकी एक, परीट गल्लीत चार, महूद दोन, दक्षिण सोलापुरातील हत्तरसंग, मंद्रूप येथे प्रत्येकी एक, मुस्तीत दोन रुग्ण आढळले आहेत.

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांत आतापर्यंत झाल्या 30 हजार 47 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट 
  • आज (सोमवारी) एक हजार 20 पैकी 151 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; 112 प्रलंबित अहवाल 
  • ग्रामीणमध्ये आठ जणांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या आता 120 झाली 
  • जिल्ह्यातील दोन हजार 349 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 625 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT