सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात 177 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळवृत्तसेवा
सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 177 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 641 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 464 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 177 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 237 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. कोरोनामुळे आज 10 जणांचा जीव गेला आहे. 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 425 एवढी झाली आहे. कोरोनामुळे 862 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अद्यापही वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार 112 एवढी आहे. 25 हजार 451 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 
मानेगाव (ता. माढा) येथील 75 वर्षाचे पुरुष, गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथील 70 वर्षाची महिला, टेंभुर्णी (ता. माढा) येथील 60 वर्षाचे पुरुष, गुळपोळी (ता. बार्शी) येथील 55 वर्षाचे पुरुष, अरळी (ता. अक्कलकोट) येथील 55 वर्षाची महिला, लिंक रोड पंढरपूर येथील 65 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, अंकोली (ता. मोहोळ) येथील 59 वर्षाचे पुरुष, आलेगाव (ता. सांगोला) येथील 40 वर्षाची महिला तर नेवरे (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाच्या पुरूषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT