सोलापूर

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 182 नवे कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 182 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आज करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या अतिशय कमी होती. त्यातही 182 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यूही झाला आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज केवळ 978 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 796 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 182 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तपासणी केलेल्यांची संख्या कमी असूनही पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या जास्त आल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 28 हजार 577 जण कोरोनामुळे बाधित झाले आहेत तर 795 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही कोरोनाग्रस्त झाल्याने चार हजार 101 जणांवर वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झाल्याने 23 हजार 681 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

आज शेलगाव (ता. करमाळा) येथील 50 वर्षाची महिला, तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर) येथील 62 वर्षाची महिला, अर्जुंसोंड (ता. मोहोळ) येथील 47 वर्षाचे पुरुष, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील 55 वर्षाचे पुरुष, दुधनी (ता. अक्कलकोट) येथील 74 वर्षाचे पुरुष, अकोले बुद्रुक (ता. माढा) येथील 58 वर्षाचे पुरुष, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील 75 वर्षाचे पुरुष, लाईफ लाईन हॉस्पिटल शेजारी पंढरपूर येथील 67 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT