logo 
सोलापूर

लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍सची 20 टक्के पगारवाढ, कामगारांसाठी गुड न्यूज : कोरोनाच्या संकटानंतरही कर्मचाऱ्यांचे जपले हित 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचे संकट अनपेक्षितपणे आले आणि सर्वांचेच जीवनमान बदलून गेले. कोरोनामुळे उद्योग व व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या त्यांच्या पगारी कमी झाल्या. उद्योग व व्यवसायात बहुतांश ठिकाणी अशीच निराशाजनक स्थिती असताना मोहोळ तालुक्‍यातील लोकनेते इंजीनियरिंग वर्क्‍सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना 20 टक्‍क्‍यांची पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

शेती औजाराच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍सने संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हक्कांची जपणूक केली आहे. कोरोनाच्या संकटातून आलेल्या निराशेच्या वातावरणावर लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍सने सकारात्मक कृती केली आहे. जिल्ह्यातील इतर उद्योग व व्यवसायांसाठी त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍समध्ये काम करणाऱ्या जवळपास 45 कर्मचाऱ्यांना या पगारवाढीचा लाभ होणार आहे. 

सध्या सुरु असलेल्या जानेवारीपासून ही पगारवाढ लागू करण्यात आली असल्याची माहिती लोकनेते इंजिनीरिंग वर्क्‍सचे प्रमुख विष्णू थेटे यांनी दिली. अनगर व मोहोळ येथील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत शेतीच्या औजारांची निर्मिती केली जाते. सोलापूर-पुणे महामार्गावर वडवळ येथे महाराष्ट्र ऍग्रो मॉल एजन्सीच्या माध्यमातून लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍सच्या "लोकनेते नांगर'ची विक्री केली जाते. ट्रॅक्‍टरने शेती करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या अवजारांची लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍समध्ये केली जाते. लोकनेते इंजिनिअरिंग वर्क्‍सचा "लोकनेते नांगर' हा ब्रॅण्ड अल्पावधितच राज्यात आणि राज्याबाहेर नावारुपास आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT