ST employee strike solapur sakal
सोलापूर

६०० पैकी २०० बस रस्त्यावर ;आगारात २० खासगी चालकांची नियुक्‍ती

शासनात विलिनीकरणाशिवाय माघार नाहीच; कर्मचारी संपावर ठाम

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी मागील तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण नऊ आगारातून एसटीची वाहतूक हळूहळू सुरू झाली. मात्र सोलापूर विभागातील एकूण ६०० बसपैकी २०० गाड्या धावत असल्याची माहिती यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाला तीन महिने उलटून गेले तरीही कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. एसटी प्रशासनाकडून सेवासमाप्ती, निलंबन, बडतर्फीसह अनेक प्रयत्नांनंतरही विलिनीकरण या मागणीच्या पूर्ततेसाठी संपकरी कर्मचारी आपल्या ध्येयापासून जराही विचलित झाले नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून खासगी चालकांची नियुक्‍ती करण्यात आली. सोलापूर आगारात एकूण २० खासगी चालकांची नियुक्‍ती करण्यात आल्याने एसटीच्या चाकांना गती मिळत आहे. दुसरीकडे एसटी कर्मचारी संपावर असल्याने एसटीचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

खासगी वाहतूकदारांना फायदा

विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीवर संपकरी ठाम असून, आम्ही दुखवट्यात आहोत. आमच्या ६१ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आमच्यावर सुरू असलेला अन्याय दूर करून शासनाने आमच्या हक्काची मागणी मान्य करावी, अशी संपकरी कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका आहे. ग्रामीण भागाची मोठी मदार एसटीवर असल्याने या भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे. त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असून, शेतकरी, रुग्णांना त्याची झळ पोहोचली आहे. याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत असल्याचे पहायला मिळत आहे.

एसटी कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून संपावर आहेत. दरम्यान, सध्या एसटीची वाहतूक हळूहळू वाढत असून, सहाशे बसपैकी दोनशे बस धावत आहेत. येत्या काळात आणखी गाड्या वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.

- सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT