सोलापूर

`या` शहरातील 2030 दिव्यांग घेताहेत शासकीय सवलती 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - शहरातील 2030 दिव्यांग शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी ठरले आहेत. 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांगांना शासकीय सवलती मिळणार आहेत. या गटातील दिव्यांग सर्वाधिक आहेत. या दिव्यांगांना महापालिकेकडून 14 कलमी कृती आराखड्याद्वारे सवलती दिल्या जात आहेत. 

दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात तीनऐवजी पाच टक्के तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावात शिफारशी करण्यात आल्या आहेत. नोंदणी झालेल्या दिव्यांगांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून, जिल्हा शल्यचिकित्साकडून तपासणी करून घेण्याची जबाबदारी कामगार कल्याण अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. तरतूद निधी एका वर्षात 100 टक्के खर्च झाला पाहिजे, असा आदेश शासनाने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्वसाधारण सभेने निर्णय घेऊन शासनाच्या आदेशानुसार सवलती लागू केल्या. 


आकडे बोलतात... 
0 ते 39 टक्के दिव्यांग ः 31 
40 ते 70 टक्के दिव्यांग ः 1218 
71 ते 100 टक्के दिव्यांग ः 781 
एकूण दिव्यांग ः 2030 

दिव्यांगांसाठी शिफारस केलेल्या सुविधा-सवलती 
- शाळा व महाविद्यालयात शिकणाऱ्यांसाठी ः 7.50 लाख रुपये 
- 100 बचत गटांची स्थापना, पाच लाखांची तरतूद 
- दिव्यांगांच्या विवाहासाठी तरतूद ः 10 लाख 
- दिव्यांगांसाठी स्पर्धांचे आयोजन ः पाच लाख 
- व्यवसायासाठी अनुदान ः 12.50 लाख 
- साहित्य व वस्तूंचा पुरवठा ः 10.50 लाख 
- व्यायामशाळेची उभारणी ः 30 लाख 
- पाच उद्यानांत आधुनिक पद्धतीची खेळणी ः 15 लाख 
- मेजर, मिनी व मंडईतील गाळ्यांमध्ये आरक्षण ः तीन टक्के 
- पंतप्रधान आवास योजना तळमजल्यावरील घरकुले ः तीन टक्के 
- मंडईतील ओटे पूर्णपणे मोफत 
- पोहण्याचा तलाव पूर्णपणे मोफत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT