corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 205 नवे कोरोनाबाधित, एकाच दिवशी 394 कोरोना मुक्त 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 146 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 941 अहवाल निगेटिव्ह आले असून 205 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 394 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूरच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 27 हजार 998 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 753 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 4 हजार 506 जणांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 22 हजार 339 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या तीन व्यक्तींमध्ये माढा तालुक्‍यातील चव्हाणवाडी येथील 34 वर्षीय महिला, मंगळवेढा तालुक्‍यातील होनमाने गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष आणि बार्शी शहरातील शिवाजीनगर येथील 85 वर्षीय महिलेचा समावेश आहे. कोरोना चाचण्यांचे 71 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 1 लाख 80 हजार 231 कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT