corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 216 नवे कोरोना बाधित, चौघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे तीन हजार 496 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 हजार 280 अहवाल निगेटिव्ह आले असून 216 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

एकाच दिवशी 104 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 34 हजार 766 झाली आहे. त्यापैकी 32 हजार 78 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 1 हजार 666 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 हजार 22 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 45 अहवाल प्रलंबित आहेत. 

ग्रामीण भागात सध्या 11 हजार 610 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये 2 हजार 623 जण आहेत. आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील श्रीपूर येथील 68 वर्षीय पुरुष, बार्शी मधील सावळे गल्ली येथील 50 वर्षीय महिला, पंढरपूर तालुक्‍यातील करकंब येथील 65 वर्षिय पुरुष व 60 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT