218 active patients of Corona in Solapur  Sakal
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे २१८ सक्रिय रुग्ण

नव्याने ४७ पॉझिटिव्ह; विषाणूचा संसर्ग होतोय कमी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. मृत्यूदरही नियंत्रणात आल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात सध्या २१८ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागातील अक्‍कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर या तालुक्‍यात शनिवारी (ता. १९) एकही रुग्ण आढळलेला नाही. उर्वरित तालुक्‍यांमध्येही खूपच कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ तालुक्‍यांमध्ये एक लाख ८५ हजार ८०९ व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी बहुतेक रुग्ण कोरोनामुक्‍त झाले. सध्या १७२ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

त्यातील बहुतेक रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांच्याच घरी उपचार सुरु आहेत. दुसरीकडे शहरातील ३३ हजार ६३८ व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील आता ४६ रुग्ण सक्रिय आहेत. शहरातील ३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून त्यांच्यावर त्यांच्याच घरी उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील अजूनही चार ते साडेचार लाख व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतलेली नाही. जिल्ह्यातील सर्वांनी नियमांचे पालन केल्याने व प्रतिबंधित लस टोचल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याची स्थिती आहे. तरीही, कोरोना गेल्याच्या अविर्भावात न राहता नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT