corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमधील 219 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त, तिघांचा मृत्यू, 121 नवे बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 354 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 233 अहवाल निगेटिव्ह आले असून 121 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी 219 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 
ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 55 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. सध्या 12 हजार 15 जणांना होम क्वारंटाईन तर तीन हजार 100 जणांना इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या आता 36 हजार 10 झाली आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 50 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1 हजार 533 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ग्रामीण भागातील 33 हजार 427 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या अहवालामध्ये मृत्यू दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील तांदूळवाडी येथील 75 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील हत्तूर येथील 72 वर्षीय महिला आणि सांगोला तालुक्‍यातील वाकी शिवणे येथील 92 वर्षिय महिलेचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT