corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 241 नवे कोरोना बाधित, तिघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री बारा वाजे पर्यंत कोरोना चाचणीचे 6 हजार 10 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील पाच हजार 769 अहवाल निगेटिव्ह आले असून 241 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवशी 133 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या आता 34 हजार 32 झाली आहे. कोरोना मुळे आतापर्यंत एक हजार सात जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 384 जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 31 हजार 641 जण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोना चाचणीचे अद्यापही 49 अहवाल प्रलंबित आहेत.

ग्रामीण भागातील 11 हजार 561 जणांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये सध्या 2 हजार 384 जण आहेत. ग्रामीण भागातील दोन लाख 63 हजार 942 कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. आजच्या अहवालात मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरसमधील 65 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील बोहाळी येथील 30 वर्षिय पुरुष आणि मंगळवेढ्यातील काझी गल्लीतील 62 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar , Bhingar

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणणार : संजय राऊत

Marathwada Yellow Alert : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाच्या सरी ; ठिकठिकाणी हजेरी; उन्हाच्या झळा, उकाड्यापासून काहीसा दिलासा

SCROLL FOR NEXT