25 lakh on fuel for maintenance of ST bus 
सोलापूर

मोठी ब्रेकिंग! लॉकडाऊनमध्ये जागेवर थांबलेल्या लालपरीच्या देखभालीसाठी इंधनावर लाखोंचा चुराडा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील रेल्वेसह संपूर्ण प्रवासी वाहतूक मागील दीड महिन्यांपासून बंद आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 16 हजारांहून अधिक बस जागेवरच थांबल्या आहेत. देखभालीसाठी थांबलेल्या बस गाड्या दररोज किमान दहा मिनिटे कराव्या लागत आहेत. त्यासाठी इंधनावर सुमारे 25 लाखांहून अधिक रुपयांचा खर्च झाल्याची माहिती महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक 22 मार्चपासून संपूर्णपणे बंद आहे. परिवहन महामंडळाला दररोज सुमारे 22 कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागील दीड महिन्यात महामंडळाला पदरमोड करावी लागली आहे. त्यातच या बस गाड्या नादुरुस्त होऊ नयेत याची खबरदारी म्हणून दररोज किमान दहा मिनिटे थांबलेली प्रत्येक बस सुरू ठेवावी लागत आहे. दुसरीकडे नादुरुस्त गाड्या दुरुस्त करण्याच्या विभागीय कार्यशाळा ही बंद असल्याने यांत्रिक कर्मचारी बसूनच आहेत. सोलापूर सहन या जिल्ह्यांमधील विभाग नियंत्रकांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना यांत्रिक कार्यशाळा सुरू करण्याच्या परवानगीचे पत्र पाठविले आहे. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे जागेवरच असलेल्या बस गाड्यांचे टायर्स, इंजिन व बॅटरी दुरूस्तीचेही काम रखडले आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर महामंडळाच्या बसेस देखभाल- दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.

यांत्रिक कार्यशाळा सुरू करण्याच्या परवानगीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
सोलापूर विभागातील बस स्थानकांमध्ये सुमारे 775 गाड्या लॉकडाऊन सुरु झाल्यापासून उभ्या आहेत. दरम्यान, नादुरुस्त गाड्यांची दुरुस्ती व्हावी, यासाठी यांत्रिक कार्यशाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. मात्र, त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या गाड्या खबरदारी म्हणून दररोज दहा मिनिटे सुरू ठेवाव्या लागत आहेत.
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT