02Child_Mask_0.jpg 
सोलापूर

शहरात आढळले 27 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह ! "बॉईज'मध्ये उघडली पोस्ट कोविड ओपीडी

तात्या लांडगे

सोलापूर : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर या वर्गांना शिकविणाऱ्या सर्वच शिक्षकांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केले. त्यात शहरातील सुमारे दोन हजार शिक्षकांपैकी आतापर्यंत एक हजार 574 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. 'आरटीपीसीआर' व रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये एकूण 27 शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन शिक्षकेतर कर्मचारीही कोरोना बाधित आढळले आहेत.

कोरोनातून मुक्‍त झालेल्या रुग्णांमध्ये भिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यांना कोरोनाचे उपचार घेतल्यानंतर श्‍वसन तथा छातीचा त्रास होऊ नये, यासाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यानुसार सोलापूर महापालिकेने बॉईज नागरी आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड ओपीडी सुरु केली आहे. त्याठिकाणी कोरोनातून मुक्‍त झालेल्या रुग्णांच्या मनातील भिती, त्यांचा मानसिक तणाव दूर करून त्यांच्यावर स्वतंत्र उपचार केले जात आहेत. दरम्यान, शहरातील आणखी पाचशे शिक्षकांची कोरोना टेस्ट झालेली नाही. आज एकूण चारशे शिक्षकांची कोरोना टेस्ट पार पडली. त्यात नऊ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असून आणखी 59 जणांचे रिपोर्ट आलेले नाहीत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरू दुधभाते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे...

  • कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून रुग्णालयात मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक रुग्णांचे आठवड्यातून एकदा समुपदेशन करावे
  • रुग्णालयातील मनोविकारांचे निदान करण्यासाठी संबंधित रुग्णालयातील डॉक्‍टरांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन रुग्णांनाही द्यावे प्रशिक्षण
  • आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेले तथा तसा विचार करणाऱ्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून मानसोपचारतज्ज्ञांच्या देखरेखीत व्हावेत उपचार
  • औषधे त्यांच्याजवळ न ठेवता देखरेखेखालीच द्यावीत; त्यांच्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करुन द्याव्यात
  • सातत्याने सेवा देत असलेले डॉक्‍टर, परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो; त्यांचा तणाव करावा दूर
  • रुग्णालयात मानसोपचार तथा मानसशास्त्रज्ञ उपलब्ध नसल्याने खासगी सेवा देत असलेल्या तज्ज्ञांची नियुक्‍ती करावी; त्यांचे मानधन कोरोना निधीतून द्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT