28 inmates of Sangola Jail have been found to be corona positive 
सोलापूर

सांगोल्यात 24 कैदी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील सर्वांची होणार चाचणी, पोलिस दलात खळबळ

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : येथील जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यांपैकी 28 कैद्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या कैद्यांच्या संपर्कातील असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. तसेच शहरात सुरू असणाऱ्या सर्व व्यापारी व त्यांच्या कामगारांची शनिवारी (ता. 27) कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, 289 जणांच्या कोरोना चाचणीमध्ये एकही व्यापारी, कामगार पॉझिटिव्ह आले नाहीत. 

सांगोला जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यापैकी 24 कायद्यांची कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या कैद्यांच्या संपर्कात अजून किती जणांचा समावेश आहे, याचा तपास घेतला जात असून या संपर्कातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

तसेच या पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना कोविड सेंटरमध्येही पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. शहरातील सर्व व्यापारी व काम करणाऱ्या कामगारांच्या तपासणीस शनिवार (ता. 27) पासून सुरुवात झाली. तपासणीच्या पहिल्या दिवशी 289 जणांची टेस्ट करण्यात आली असून यामध्ये एकजणही कोरोना पॉझिटिव्ह आले नाहीत. तपासणीमध्ये औषध विक्रेते, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, कापड दुकान यांनी तपासणी करुन घेत आहेत. 

शहरातील सर्व व्यापारी व कामगारांना कोविड-19 ची चाचणी बंधनकारक असून जे दुकानदार व त्यांचे कामगार चाचणी करणार नाहीत, अशी दुकाने तपासणी करून सील करण्यात येतील 
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT