corona-positive-1585803595.jpg 
सोलापूर

सोलापूर शहरात 29 नवे रुग्ण! एकाचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या सहा हजार 93 झाली 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आज नव्याने 29 रुग्णांची भर पडली असून समर्थ नगरातील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या आता सहा हजार 93 झाली असून आतापर्यंत 51 हजारांहून अधिक व्यक्‍तींची टेस्ट करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज एक हजार 179 व्यक्‍तींचे रिपोर्ट दिले. रुग्णांच्या थेट संपर्कातील 27 संशयितांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 51 हजार 635 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील सहा हजार 93 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा 
  • आज एकाचा मृत्यू तर नव्याने 29 व्यक्‍ती पॉझिटिव्ह 
  • कोरोनाने शहरातील 394 रुग्णांचे घेतले बळी 
  • आतापर्यंत शहरातील चार हजार 593 रुग्णांची कोरोनावर मात 

पांढरे वस्ती (बाळे), बुधवार पेठ, साखर पेठ, पाच्छा पेठ, मारुती मंदिराजवळ, मंत्री चंडक पार्क, रामसिंग नगर, नवोदय टेरेस (विजयपूर रोड), म्हाडा कॉलनी (जुळे सोलापूर), हनुमान मंदिराजवळ (विडी घरकूल), कोनापुरे चाळ (रेल्वे लाईन), राम नगर, टिळक नगर (नई जिंदगी), रोहिणी नगर (सैफूल), एसआरपी कॅम्प, कल्याण नगर, मोहिते नगर, विजयूपर रोड, जुनी मिल चाळ, वेणुगोपाळ नगर (मजरेवाडी), श्रीशैल नगर (शेळगी) आणि गुरुनानक नगर (कुमठा नाका) येथे आज नवे रुग्ण आढळले आहेत. शहरातील रुग्णसंख्या आटोक्‍यात आली की वाढत आहे, कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल, याबद्दल अद्याप कोणीही स्पष्टपणे सांगू शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे हेच तुर्तास ठोस उपाय असल्याचे दिसून येत आहे. 

प्रभाग कोरोनामुक्‍तीचा संकल्प नाहीच 
शहरातील 107 नगरसेवकांपैकी काही मोजक्‍या नगरसवेकांनी त्यांच्या प्रभागात रॅपिड ऍन्टीजेन टेस्टची मोहिम राबविली. मात्र, अद्याप विजयपूर रोड, जुळे सोलापूर, विडी घरकूल, शेळगी येथील रुग्णसंख्या कमी झालेली दिसत नाही. ठरावीक भागात तथा परिसरात रुग्णसंख्या वाढत असतानाही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT