Solapur Crime 
सोलापूर

वसंत विहारमध्ये एकाच रात्री ३ घरफोड्या; शिक्षक उकाड्यामुळे झोपले होते टेरेसवर; दुसऱ्या घरातील होते परगावी

उकाड्यामुळे टेरेसवर झोपल्याची संधी साधून चोरट्याने शिक्षकाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक लाख ९७ हजारांचे दागिने व रोकड लंपास केली आहे. तर त्याच परिसरातील जगदेवी मल्लिकार्जुन आवटी यांच्यासह आणखी एका घरात देखील चोरट्याने चोरी केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उकाड्यामुळे टेरेसवर झोपल्याची संधी साधून चोरट्याने नागनाथ शुक्राचार्य गावडे (रा. योगीराज महादेवी नगर, वसंत विहार, बलदवा हॉस्पिटलजवळ) या शिक्षकाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक लाख ९७ हजारांचे दागिने व रोकड लंपास केली आहे. तर त्याच्या परिसरातील जगदेवी मल्लिकार्जुन आवटी यांच्यासह आणखी एका घरात देखील चोरट्याने चोरी केली आहे.

दरम्यान, नागनाथ गावडे हे जेवण करून रविवारी (ता. ११) रात्री अकराच्या सुमारास कुटुंबियासमवेत घराच्या टेरेसवर झोपले होते. झोपताना त्यांनी घराचे दरवाजे बंद केले होते. तरीपण, चोरट्याने ते गाढ झोपी गेल्याचा अंदाज घेऊन रात्री अकरा ते पहाटे सहा या वेळेत डाव साधला. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील दागिने व पाच हजारांची रोकड लंपास केली.

चोरी झालेल्यामध्ये दोन तोळ्याचे मिनि गंठण, तीन तोळ्याचे मोठे गंठण, सात ग्रॅमचे सोन्याचे झुबे, पाच ग्रॅमची ठुशी, चार ग्रॅमचे कानातील टॉप्स, चार ग्रॅमची वज्रटिक, पाच ग्रॅमचे छोटे गंठण, पाच तोळे चांदीचे पैंजण असा मुद्देमाल असल्याची नोंद फौजदार चावडी पोलिसांत झाली आहे. तर त्याच परिसरातील जगदेवी आवटी या कुटुंबासोबत सध्या देवदर्शनासाठी दक्षिण भारतात गेल्या आहेत. त्यांच्याही घरी चोरी झाली आहे. तसेच गावडे यांच्या कॉलनीसमोरील लकशेट्टी नगरातील महेशकुमार भारत बाबर यांच्या घरात देखील चोरट्याने डाव टाकला. बाबर हे सध्या मुंबईत राहतात. सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे तपास करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी भेटी

वसंत विहार परिसरात चोरट्याने एकाच रात्री तीन घरांवर डल्ला मारला. नागनाथ गावडे यांच्या घरातून एक लाख ९७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर जगदेवी आवटी व महेशकुमार बाबर यांच्या घरी कोणीच नसल्याने त्यांच्या घरातून किती मुद्देमाल चोरी झाला, याची माहिती अजून समोर आलेली नाही. घरफोडीची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद आदींनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘सीसीटीव्ही’ची पडताळणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT