लोकसभेला प्रत्येक गावातून तीन-चार उमेदवार Sakal
सोलापूर

Solapur : लोकसभेला प्रत्येक गावातून तीन-चार उमेदवार; निवडणूक बॅलेट पेपरवरच घेण्यास भाग पाडण्याची मराठा समाजाची रणनीती

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून तीन ते चार उमेदवार उभे करावेत. एका- एका मतदार संघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करावेत.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून तीन ते चार उमेदवार उभे करावेत. एका- एका मतदार संघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करावेत. कोणत्याही परिस्थितीत सरकारला बॅलेटपेपरवरच निवडणुका घेण्यास भाग पाडावी, अशी रणनीती मराठा समाजाने आखली आहे.

रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे प्रास्ताविक गणेश देशमुख यांनी केले. यावेळी माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, मिलिंद भोसले,

भक्ती जाधव, पंडित ढवण, बालाजी सिरसट,गोविंद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. रामदास पौळ, संदीप मांडवे, किरण घाडगे, दीपक वाडेकर शिवाजी कदम, बंडू ढवळे, अरविंद केदार यांनी यावेळी विचार व्यक्त केले.

दहा टक्के आरक्षण अमान्य

राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला अमान्य असून याचा काहीही उपयोग नाही. हे आरक्षण केंद्र सरकारच्या नोकऱ्यात नाही. विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठी व नोकऱ्यांसाठी याचा काहीच उपयोग नाही. यामुळे ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण मिळावे या मागणीवर मराठा समाजाने ठाम राहावे असा निश्चय यावेळी करण्यात आला.

सदावर्तेंचा प्रचार कोण करेल

गुणरत्न सदावर्ते यांना सोलापूर मतदारसंघातून भाजपच्या वतीने तिकीट दिले जाण्याचे वृत्त आहे. सदावर्ते यांच्या पाठीशी भाजपच आहे. भाजप स्वतः आरक्षण देते आणि स्वत:च सदावर्ते यांना पुढे करत काढून घेते. मराठा समाजाचा सुरवातीपासूनच आरोप या उमेदवारीमुळे सिद्ध होणार आहे. जर भाजपने सदावर्ते यांना तिकीट दिले तर भाजपचा मराठा समाजाचा कोणता नेता प्रचारासाठी येतो तेच आम्ही पाहू असे आव्हान माऊली पवार यांनी केले.

बैठकीत ठरलेले मुद्दे

  • लोकवर्गणीतून उमेदवार उभे करावेत

  • प्रत्येक गावातून तीन ते चार तर प्रत्येक मतदारसंघात एक हजार उमेदवार

  • प्रत्येक घरावर, वाहनावर ‘मी मतदार- मी उमेदवारचा फलक झळकणार

  • राखीव मतदारसंघासाठी मराठा समाजाच्या पाठिंब्यावरील उमेदवार

  • अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसांपासून अर्ज भरण्यास प्रारंभ

  • माढा, सोलापूर व धाराशिव मतदार संघातून उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT