chikhalthan.jpg 
सोलापूर

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त 304 जणांनी केले रक्तदान 

सकाळ वृत्तसेवा

चिखलठाण(सोलापूर)ः शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चिखलठाण येथील रक्तदान शिबिरात 304 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
युवकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

कोरोना संकटकाळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजन केले. तालुक्‍याचे नेते चिखलठाण गावचे सरपंच चंद्रकात सरडे यांच्या मार्गदर्शनात शिबिर झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चिखलठाण ग्रामपंचायत व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, अश्‍विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 

रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच चंद्रकांत सरडे यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास गावातील युवक कार्यकर्ते, ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 304 रक्तदात्यांनी विक्रमी रेकॉर्ड करत रक्तदान केले. करमाळा तालुक्‍यात सर्वाधिक रक्तदान करण्याचा विक्रम चिखलठाण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. रक्तदान करणाऱ्यांचा पाण्याचे जार व हेल्मेट भेट देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिरात गावातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवराज्याभिषेक दिन रक्तदान शिबिराने साजरा केल्याने चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे, पोलिस पाटील, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर ‘रेड लाइन’ सज्ज; एप्रिलपासून मेट्रो धावणार, २३ किमी मार्गाच्या चाचण्या यशस्वी..

MHADA Mumbai Lottery : मुंबईत स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी ! म्हाडाच्या FCFS सदनिकांसाठी आजपासून अर्ज नोंदणी सुरु, काय आहे प्रक्रिया ?

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..

मालवणच्या समुद्रकिनारी एकाचवेळी ७५ डॉल्फिनचा कळप, ड्रोनने टिपले दुर्मिळ आणि विहंगम दृश्य; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT