0corona_498.jpg 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 33 पॉझिटिव्ह ! कौठाळी, अनगर, बावी, पानगावात कोरोनाचा शिरकाव 

तात्या लांडगे

सोलापूर : रविवारी (ता. 12) ग्रामीण भागात एकूण 33 व्यक्‍तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता ग्रामीणमधील रुग्णांची संख्या 850 झाली असून मृतांची संख्या 36 झाली आहे. आज कौठाळी, अनगर, बावी, पानगाव याठिकाणी प्रथमच कोरोनाची एन्ट्री झाली आहे. 

'या' गावात सापडले 33 कोरोना पॉझिटिव्ह 
रविवारी (ता. 12) सोलापूर ग्रामीणमध्ये 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण रुग्णंसख्या 850 झाली असून दोन मृत्यूसह मृतांची संख्या 36 वर पोहचली आहे. आज मंगळवेढ्यातील बोराळे येथे दोन, करमाळ्यातील जिंतीत सहा, पंढरपुरातील अनिल नगरात एक, तर दक्षिण सोलापुरातील भंडारकवठ्यात दोन, नवीन विडी घरकुलात एक, होटगीत एक, वळसंगमध्ये चार, घोडा तांड्यात तीन, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कौठाळीत प्रथमच एक, तळे हिप्परगा येथे दोन, मोहोळ तालुक्‍यातील अनगरमध्ये पहिल्यांदाच एक रुग्ण सापडला आहे. तसेच अक्‍कलकोटमधील कुरनूर येथे एक, मैंदर्गीत एक, तर बार्शीतील भवानी पेठेत एक, नाईकवाडी प्लॉटमध्ये एक, सुनिल सावंत सर्व्हिसजवळ एक, बावीत एक, वैरागमध्ये दोन, पानगावात एक रुग्ण सापडला आहे. 

ठळक बाबी.... 

  • सोलापूर ग्रामीणमधील आतापर्यंत सहा हजार 295 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले 850 कोरोना पॉझिटिव्ह; त्यापैकी 36 जणांचा झाला मृत्यू 
  • ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 72 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित 
  • एकूण 850 रुग्णांपैकी 340 रुग्णांनी केली कोरोनावर मात; अद्याप 574 रुग्णांवर उपचार सुरु 
  • आज चिंचगाव (ता. माढा) येथील 52 वर्षीय महिलेचा तर मनगिरे मळा (बार्शी) येथील 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घेतला बळी 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

  • अक्‍कलकोट : 156 
  • बार्शी : 178 
  • करमाळा : 12 
  • माढा : 26 
  • माळशिरस : 11 
  • मंगळवेढा : 5 
  • मोहोळ : 45 
  • उत्तर सोलापूर : 91 
  • पंढरपूर : 42 
  • सांगोला : 5 
  • दक्षिण सोलापूर : 279 
  • एकूण : 850 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT