2corona_agencies_1.jpg 
सोलापूर

शहरात आज 34 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू! 118 रुग्ण बरे होऊन गेले घरी 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या आटोक्‍यात आली आहे, परंतु संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. आज 374 संशयितांमध्ये 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 35 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

ठळक बाबी... 

  • शहरात आतापर्यंत 56 हजार 787 पैकी आढळले सहा हजार 343 व्यक्‍ती पॉझिटिव्ह 
  • आज 374 अहवालात 34 जणांना कोरोनाची बाधा; दोघांचा झाला मृत्यू 
  • तेलंगी पाच्छा पेठेतील 65 वर्षीय महिला, रेल्वे लाईन्स परिसरातील 63 वर्षीय पुरुषाचा बळी 
  • शहरातील मृतांची संख्या 401; चार हजार 856 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत शहरातील एक हजार 76 रुग्णांवर उपचार सुरु; आज 11 रुग्ण बरे होऊन घरी परतले 
  •  

रेल्वे लाईन्स, उमा नगरी, लोकमंगल विहार (बाळे), भारत नगर (कुमठा नाका), विको प्रोसेसजवळ, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), सुविद्या नगर, निरुपम सोसायटी, भगवंत सोसायटी (विजयपूर रोड), लक्ष्मी पार्क, रुबी नगर, वसंत नगर (जुळे सोलापूर), एच ग्रूप (विडी घरकूल), दमाणी नगर, हेवेन अपार्टमेंट (रेल्वे लाईन), कुमठे, हत्तुरे वस्ती (शिवशाही नगर), हत्तुरे नगर (विमानतळ), जुनी मिल चाळ या ठिकाणी नव्याने रुग्ण सापडले आहेत. शहरातील चार हजार 610 संशयितांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहेत. तर आयसोलेशन क्‍वारंटाईनमध्ये 190 व्यक्‍ती असून होम आयसोलेशनमध्ये 17 संशयित आहेत. शहरातील संसर्ग कमी होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सर्व खासगी रुग्णालयांना तापसदृश्‍य तथा को-मॉर्बिड रुग्णांना ऍन्टीजेन टेस्टसाठी नागरी आरोग्य केंद्रात स्वॅब घेण्यासाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या कामात कुचराई करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला असून संबंधित डॉक्‍टरांवरही कारवाई केली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT