sucide sakal
सोलापूर

Solapur : अवकाळी पावसाने नुकसान झाल्याच्या धास्तीने शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या!

"द्राक्षाला दर नाही व चालू वर्षी बाग फेल लागवडीसाठी घेतलेले बँकांचे कर्ज कशाने फेडावयाचे या धास्तीने पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने त्याच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास

राजकुमार शहा

मोहोळ : गेल्या तीन वर्षापासून द्राक्षाला दर नसल्याने, तसेच चालु वर्षी बाग "फेल" गेल्याने बाग लागवडीसाठी घेतलेले खाजगी व विविध बँकांचे कर्ज कशाने फेडावयाचे या धास्तीने एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने त्याच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार ता 4 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन अशोक खांडेकर वय 35 रा मनगोळी ता मोहोळ असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, सचिन खांडेकर यांनी तीन वर्षांपूर्वी द्राक्ष बाग लागवड केली आहे. बागेची लागवड करताना खर्चासाठी त्यांनी खाजगी व विविध बँकांचे कर्ज घेतले होते.

मात्र गेल्या दोन वर्षापासून द्राक्षाला दर नसल्याने तसेच बाग फेल गेल्याने बँकाच्या कर्जाचे हप्ते वेळेत न गेल्याने सचिन हा निराश होता. तो एकटाच कोणाला काहीही न बोलता बसून राहायचा. तसेच चालू वर्षी अवकाळी पाऊस पडल्याने व पिकाचे नुकसान झाल्याने तो जास्तच निराश होता.

दरम्यान मंगळवारी ता 4 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहुल शेंबडे यांना बबलू रमेश खांडेकर यांनी, सचिन याने त्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे सांगितले. तातडीने सचिन यास मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत झाल्याचे घोषित केले.

या घटनेची खबर राहुल बिभीषण शेंबडे रा. मनगोळी यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT