st sakal
सोलापूर

सोलापूर : दररोज 36 हजार प्रवाशांचा एसटीने प्रवास

160 बस रस्त्यावर ; 27 लाखांचे उत्पन्न

विजय थोरात

सोलापूर : मागील चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपामुळे काही दिवस बस बंद होत्या. परंतु बहुतांश कर्मचारी हजर झाल्याने जिल्ह्यात 160 बस सुरू झाल्या आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज 36 हजार प्रवासी प्रवास करीत असून, सत्तावीस लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील चार महिन्यांपासून संप पुकारला आहे. संप मिटवण्यासाठी शासनाकडून विविध उपाय योजना वेळोवेळी करण्यात येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत 3900 कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार 300 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास 160 बस विविध मार्गावर धावत असल्याचे यावेळी अधिकाऱ्याने सांगितले. मुख्य मार्गावर बस सुरू असल्या तरी ग्रामीण भागात अद्यापही बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून केली जात आहे. आता एसटी हळूहळू पूर्ववत येत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

ठळक बाबी....

  • - जिल्ह्यात मुख्य मार्गावर बस सुरु

  • - ग्रामीण भागातील बस अद्यापही बंदच

  • - ग्रामीण भागातील बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

  • - ग्रामीण भागात बस सुरू कराव्यात अशी ग्रामीण भागातील प्रवाशांची मागणी

जास्तीत जास्त बस सुरू होतील यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 160 बस दररोज धावत असून, प्रवाशांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळात आणखीन यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

- सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

आकडे बोलतात

  • दररोज धावणाऱ्या गाड्या - 160

  • दररोज प्रवास करणारे प्रवासी - 36 हजार

  • दररोज मिळणारे उत्पन्न - 27 लाख

  • एकूण किलोमीटर - 60 हजार

  • एकूण फेऱ्या - 590

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT